Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! आई उपचार घेत असताना 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; त्याच दिवशी आईचीही प्राणज्योत मालवली

चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. स्वयंपाक करताना गंभीर भाजलेल्या केता सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच दिवशी त्यांचा 8 वर्षीय मुलगा वंश याचा नाल्यात पडून मृत्यू झाला. या दुहेरी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 02:25 PM
crime (फोटो सौजन्य: AI)

crime (फोटो सौजन्य: AI)

Follow Us
Follow Us:
  • गंभीर भाजलेल्या केता सूर्यवंशी यांचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू.
  • 8 वर्षीय वंश सूर्यवंशी बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्यात आढळला.
  • एकाच दिवशी आई आणि मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातून एक हृदयद्रावक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नियतीने एका कुटुंबावर असा घाला घातला की, एका दिवसात आई आणि तिच्या अवघ्या आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना दुसरीकडे मुलाचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुहेरी दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

केता दीपक सूर्यवंशी (३०) आणि वंश दीपक सूर्यवंशी (८) असे मृत्यू झालेल्या आई व मुलाची नावे आहेत. बल्लारपूर येथील रहिवासी असलेल्या केता सूर्यवंशी या 8 जून रोजी घरात स्वयंपाक करत असताना अचानक लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णलयात आणि त्यांनतर जिल्ह्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘मैदानावर जाते’ म्हणत घराबाहेर पडली, काही तासांत शिक्षिकेचा मृतदेह सापडला; छ. संभाजीनगरात खळबळ

बाहेर पडला आणि…

८ वर्षांचा चिमुरडा वंश हा त्याचे आजोबा शीतल सूर्यवंशी यांच्यासोबत घरी राहत होता.शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वंश अचानक घरातून बाहेर पडला आणि बेपत्ता झाला. बराच शोध घेऊनही त्याचा कुठेच पत्ता न लागल्याने आणि तो सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने आजोबांनी पोलिसांत तो हरविल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांनी वंशाचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली. घराजवळ असलेल्या एका नाल्यामध्ये वंशाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. खेळता खेळता पाय घसरून नाल्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकाच दिवशी आई आणि चिमुकल्याचा मृत्यू

ज्या दिवशी वंशाचा नाल्यात पडून मृत्यू झाला त्याच दिवशी नागपूरच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणारी त्याची आई केता सूर्यवंशी यांचाही मृत्यू झाला.एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी या दोन घटना घडल्या. या घटनेने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बल्लारपूर पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूची नोंद केली असून पोलीस या दोन्ही घटनांचा सखोल तपास करत आहेत. पोलीस घातपाताच्या अँगलने देखील तपास करत आहे.

Chhattisgarh News : वाळू उत्खनन वादात भाजप नेत्याला फॉर्च्यूनर कारमध्ये जिवंत जाळलं, ३ जण जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत आई आणि मुलाची नावे काय आहेत?

    Ans: केता दीपक सूर्यवंशी (30) आणि वंश दीपक सूर्यवंशी (8) अशी त्यांची नावे आहेत.

  • Que: वंशचा मृतदेह कुठे आढळला?

    Ans: घराजवळील नाल्यात वंशचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

  • Que: पोलिस कोणत्या दृष्टीने तपास करत आहेत?

    Ans: केता यांना आग कशी लागली आणि वंशचा मृत्यू नेमका कसा झाला यासह घातपाताचा कोणताही कोन आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Chandrapur crime a heart wrenching incident an 8 year old boy passed away while his mother was undergoing treatment the mother also breathed her last on the very same day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.