Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: क्षणात आनंद शोकात! लग्नात नाचताना 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना

चंद्रपूरमध्ये मित्राच्या लग्नात डीजेवर नाचताना 25 वर्षीय तरुण अचानक कोसळला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 11:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नात डीजेवर नाचताना तरुण कोसळला
  • रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले
  • हृदयविकाराच्या झटक्याची प्राथमिक शक्यता
चंद्रपूर: चंद्रपूर शहरात लग्नसोहळ्यात दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. मित्राच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

काय घडलं नेमकं?

अल्पेश दहगावकर असे २५ वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पेश हा लग्नाच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचताना अचानक खाली कोसळला. सुरुवातीला उपस्थितांना हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र काही वेळातच तो प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्याला गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

Gujrat Crime: रात्रीचं जेवण ठरलं काळ! डोसा खाल्ल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पालकांची प्रकृती चिंताजनक

परिसरात हळहळ

त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ उडाली आहे. आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. अल्पेश याच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रपुरात थरारक खून! २२ वर्षीय तरुणाने केली प्रेयसीची हत्या; आधी केला आत्महत्येचा बनाव मात्र…

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या २९ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या केल्यांनतर आरोपीने या प्रकरणाला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकेल. मात्र २० दिवसांनी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि पोलिसांच्या तपासाला एक नवी दिशा मिळाली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपीचे नाव अंकेश योगेश बहिरवार (वय २२ वर्ष) रा. सोनापूर, तहसील सावली अशी पटली आहे. तर मयत महिला प्रियांका (वय २९ वर्षे) ही तुकूम येथील रहिवासी होती. प्रियांका ही आपल्या पतीपासून विभक्त राहत होती आणि याच काळात तिची भेट स्वतःपेक्षा ७ वर्षांनी लहान असलेल्या अंकेशशी झाली होती. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघेही दुर्गापूर येथील प्रियांकाच्या घराच्या वरच्या मजल्यावर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होऊ लागले होते. प्रियांका अंकेशवर काही गोष्टींसाठी दबाव टाकत असे आणि त्याला त्याच्या कुटुंबाशी संवाद साधण्यापासून रोखत होती, ज्यातून त्यांच्यातील तणाव वाढत गेला आणि अखेर त्याचे रूपांतर हत्येत झाले.

कांदा व्यापाऱ्याने केली महिलेची फसवणूक; आधी विश्वास संपादन केला अन् नंतर 30 लाखांना गंडा घातला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील लग्नसमारंभात.

  • Que: मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता व्यक्त.

  • Que: तरुणाचे वय किती होते?

    Ans: 25 वर्षे.

Web Title: Chandrapur news joy turns to grief in an instant 25 year old man dies while dancing at a wedding incident in chandrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Accident
  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • heart attack

संबंधित बातम्या

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू
1

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान
2

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार
3

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार

Chandrapur News: चंद्रपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; महापालिकेकडे धोकादायक झाडांची नोंदच नाही
4

Chandrapur News: चंद्रपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; महापालिकेकडे धोकादायक झाडांची नोंदच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.