(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
स्ट्रक्ट्रोमॅक्स हे थर्मो-मेकॅनिकल कंट्रोल्ड प्रोसेसिंग (TMCP) तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आले आहे. पूल, उंच इमारती, समुद्रातील प्रकल्प, रेल्वे, पवन ऊर्जा प्रकल्प तसेच इतर अवजड क्षेत्रांमध्ये त्याचा वापर करता येतो.या स्टील प्लेटमध्ये उत्कृष्ट वेल्डिंग क्षमता, मजबुती, भार सहन करण्याची क्षमता, गंजरोधकता आणि फॅब्रिकेशन कार्यक्षमता आहे. त्यामुळे अभियंते आणि प्रकल्प विकासकांना आव्हानात्मक कार्यप्रणाली किंवा हवामानाच्या परिस्थितीतही स्थिर आणि टिकाऊ संरचना उभारण्यास मदत होते.
वेल्डस्टार ही अतिउच्च सामर्थ्याच्या स्टील प्लेटची श्रेणी आहे. यामुळे अभियंत्यांना सुरक्षितता आणि टिकाऊपणाशी कोणतीही तडजोड न करता संरचनांचे वजन कमी करण्यास, भार वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यास, इंधनाची बचत करण्यास आणि संपूर्ण कार्यकाळातील खर्च कमी करण्यास मदत होते.वेल्डस्टार प्रामुख्याने क्रेन, खाणकामासाठी लागणारी उपकरणे, वाहतूक व्यवस्था, समुद्रातील प्रकल्प तसेच इतर महत्त्वपूर्ण वापरांसाठी विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे दीर्घकाळातील संचालनाचा खर्च कमी करण्यास मदत होते.
AM/NS इंडियाचे संचालक आणि उपाध्यक्ष – विक्री व विपणन, रंजन धर म्हणाले, “भारताच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्राच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी अधिक गुंतागुंतीच्या प्रकल्पांमध्ये अधिक मजबुती, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता देणाऱ्या स्टीलच्या उपाययोजनांची गरज भासणार आहे. स्ट्रक्ट्रोमॅक्स आणि वेल्डस्टारमुळे भारतीय अभियंते, फॅब्रिकेटर्स आणि उत्पादकांसाठी उपलब्ध असलेल्या प्रगत हेवी प्लेटच्या पर्यायांमध्ये वाढ होईल. तसेच उच्च-मूल्याच्या वापरासाठी देशांतर्गत क्षमता अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल.”
एएम/एनएस इंडियाच्या हेवी प्लेट उत्पादनांच्या श्रेणीतील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे शाश्वत स्टीलनिर्मितीची बांधिलकी. एएम/एनएस इंडियाच्या हेवी प्लेट उत्पादनांना हरित स्टील प्रमाणपत्र मिळाले असून, डिसेंबर 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या ग्रीन स्टील टॅक्सोनॉमी अंतर्गत त्यांना 3-स्टार रेटिंग देण्यात आले आहे.
या चौकटीमध्ये प्रति टन तयार स्टीलच्या उत्पादनातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या आधारे स्टीलचे वर्गीकरण केले जाते. तसेच विविध स्टील उत्पादनांच्या शाश्वततेच्या कामगिरीचे मूल्यांकन आणि तुलना करण्यासाठी पारदर्शक व प्रमाणित, स्टार-आधारित प्रमाणपत्र प्रणाली उपलब्ध करून दिली जाते.
स्ट्रक्ट्रोमॅक्स आणि वेल्डस्टारचे लॉन्चिंग हे पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील बदलत्या गरजा पूर्ण करणाऱ्या स्टीलच्या उपाययोजना विकसित करण्यासाठी ग्राहकांसोबत जवळून काम करण्यावर एएम/एनएस इंडियाचा असलेला भर दर्शवते.या उत्पादनांमुळे पूल आणि औद्योगिक संरचनांपासून ते क्रेन, खाणकामासाठी लागणारी उपकरणे आणि वाहतूक व्यवस्थेपर्यंतच्या विविध प्रकल्पांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे भारतातील देशांतर्गत उत्पादन परिसंस्था अधिक मजबूत होण्यासही हातभार लागणार आहे.






