Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: भाजप युवा नेत्याचा आढळला मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप गूढ; छत्रपती संभाजीनगर येथील घटना

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर (30) यांचा मृतदेह नळकांडी पुलाजवळ आढळला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून कोणतेही जखमेचे किंवा अपघाताचे ठसे नसल्याने संशय वाढला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 15, 2025 | 09:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गणेश टेमकर यांचा मृतदेह हदियाबाद-नारवाडी रस्त्यालगत आढळला; जखमेचे कोणतेही चिन्ह नाही.
  • अपघात की घातपात? मृत्यूमागील कारण अद्याप गूढ, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा.
  • भाजप युवा नेत्याच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ; गंगापूर पोलिसांचा तपास सुरू.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (वय 30) यांचा मृतदेह आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृतदेह शुक्रवारी (दि. 14) दुपारी गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी रस्त्यालगत, नारवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळला. याघटनेची माहिती स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांनी पोलिसांना तात्काळ दिली. पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्ट

गणेश रघुनाथ टेमकर यांच्या मृतदेहावर कोणत्याही मारहाण किंवा शस्त्राने केलेल्या हल्ल्याचे ठसे आढळले नाहीत. तसेच कोणत्याही वाहनाने धडक दिल्याचेही स्पष्ट चिन्हे घटनास्थळी आढळली नाहीत. त्यामुळे अपघातामुळे ही घटना घडली की घातपातामुळे यावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Uttarpradesh Crime: एकाच कुटुंबातील सहा जणांचा रहस्यमय मृत्यू; पती फासावर, पत्नी-मुलांचे मृतदेह बेडवर

भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष

गणेश रघुनाथ टेमकर हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू भाजपच्या स्थानिक वर्तुळात धक्का देणारा आहे, आणि त्यांचे निधन झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ते भालगाव येथील रहिवासी होते आणि त्यांच्या अचानक मृत्यूने स्थानिक स्तरावर एक मोठा गोंधळ उडवला आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासाअंती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

विवाहित मुलगी घर सोडून गेल्याने आईची आत्महत्या, कुटुंब थेट मृतदेह पोलीस ठाण्यात घेऊन आले अन्…

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे. २० वर्षीय विवाहित महिला पूजा तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर तिच्या आईने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा कुटुंबाने वेळेवर कारवाई न केल्याचा आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबाने मृतदेह थेट उस्मानपुरा पोलीस ठाण्यात आणला. अखेर प्रियकर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

डिजिटल अरेस्टच्या नावावर दोघांना गंडा; तब्बल दोन कोटींची केली फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे का?

    Ans: नाही

  • Que: घटना घातपाताची शक्यता आहे का?

    Ans: शक्य

  • Que: शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरेल का?

    Ans: होय

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime body of bjp youth leader found cause of death still a mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा
1

संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
3

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी
4

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.