आपल्या मुलींशीही नीट बोलू दिले नाही
मृतक रविनाथ बर्डे यांचा भाऊ अमोल बर्डे (रा. हरीओमनगर, जटवाडा रोड, हर्सूल) यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार राविनाथ बर्डे यांनी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गुरुगणेशनगर येथील श्री साई लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी शिवानी हिचा रविनाथवर सतत संशय होता. “तू कोणत्या मुलीशी बोलतोस?” असा आरोप करत ती नेहमी भांडण करत असे. यासोबतच तिने त्याला आपल्या मुलाशीही नीट बोलू दिले नाही, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
राविनाथ हा सततचा संशय, भांडण आणि मानिसक त्रासामुळे तणावात होता. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तो श्री साई लॉज, गुरुगणेशनगर येथे गळफास घेत आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात केले आहे. पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहित पत्नीविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिला पतीनेच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नाही तर त्याच्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लईक जावेद अन्सारी (३६ वर्षीय) असे आरोपीचे नाव आहे. तो कन्नड तालुक्यातील कुंजखेडाचा रहिवासी आहे.
Ans: पहाडसिंगपुरा परिसरातील श्री साई लॉजमध्ये.
Ans: पत्नीचा सतत संशय, भांडण आणि मानसिक त्रास.
Ans: पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






