भारत विरुद्ध श्रीलंका (फोटो -ट्विटर)
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 363 रन्स केल्या. त्या रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ दुसऱ्या दिवशी खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो शून्यावर आउट झाला. तसेच केएल राहुल 40 रन्स करून आउट झाला.
IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले
त्यानंतर तिसऱ्या नंबरवर देवदत्त पडीकल खेळण्यासाठी आला. त्याने मात्र एका बाजूने आक्रमक पण महत्वाची अशी शतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळला. त्याने आक्रमक शतक ठोकले. शतक झाल्यावर तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर रवींद्र जाडेजाने देखील शानदार 63 रन्सची खेळी केली. भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत केवळ 2 रन्स करून आउट झाला. मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला.
#TeamIndia inching closer to the 250-run mark in the first innings 👌👌 A valuable 65-run partnership and counting between Ravindra Jadeja and Manav Suthar 🤝 Updates ▶️ https://t.co/g7rdlUUjY2 pic.twitter.com/t7MM7BOPBZ — BCCI (@BCCI) August 8, 2026
त्यानंतर भारतीय संघाकडून ध्रुव जुरेलने निराशा केली. तो एक रन करून आउट झाला. तर मानव सुथारने 41 रन्सची महत्वाची खेळी केली. कुलदीप यादवने 1 तर मोहम्मद सिराज 1, सारांश जैन 22 आणि गूरनूर ब्रार 36 रन्सवर खेळत आहे. उद्या सराव सामन्याचा शेवटचा दिवस आहे. भारताने ट्रायल पूर्ण केल्यावर श्रीलंकेला एक मोठे टार्गेट द्यावे लागेल. भारताला सामना जिंकण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे.
IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर
Rishabh Pant कधी सुधारणार?
देवदत्त पडीकलने शतकी खेळी केली. मात्र ऋषभ पंत अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत मैदानात खेळण्यासाठी आला. ऋषभ पंत आला तेव्हा भारताचा स्कोअर तीन विकेट गमावून 168 रन्स केल्या. त्यानंतर ऋषभ पंत ने 4 बॉलचा सामना केला. मात्र तो मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ऋषभ पंतचा हा खराब फॉर्म भारत संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.






