दारु पिताना वाद, तीस वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून; शिरुर तालुक्यातील घटनेनं खळबळ
कशी केली कारवाई?
पुण्यातील पर्वती पोलीस ठाणे, खडक पोलीस ठाणे आणि घोली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यात एक तरुण पोलिसांच्या रडार वर होता. तो म्हणजे शेख अहमद उर्फ बबलु सुरज सय्यद आहे. तो पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणार आहे. (Pune Crime) बबलू हा पिस्तूल विक्रेता असल्याची माहिती पोलिसांना होती. पुण्यातील अनेक गोळीबाराच्या घटनांमध्ये वापरले गेलेले पिस्तूल हे बबलूने विक्री केल्याचे याआधी सुद्धा तपासातून समोर आलं होतं. या अनुषंगाने पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना बबलू हा लातूर जिल्ह्यातील एका गावात लपल्याची माहिती मिळालं होती. यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लातूर मध्ये जात सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आहे.(Pune Crime)
सोशल मिडीया वरुन विक्री आणि…
बबलूची चौकशी केली असता तो सोशल मीडियावरून गावठी पिस्टल सोबत फोटो काढून ते प्रसारित करत होता. व पिस्टल व काडतुसे यांची खरेदी विक्री बाबत इंस्टाग्राम वरून संपर्क साधत होता. आरोपी ने मध्यप्रदेश येथील उमरठी गावातील पिस्तूल विक्रेते यांच्या संपर्कात स्वतः राहुन त्याच्याकडून आपल्या ओळखीचे लोकांना तिथे पाठवुन मध्यस्थी करुन गावठी पिस्टल खरेदी करत असल्याचं सुद्धा समोर आलं आहे. (Pune Crime) पोलिसांनी त्याच्याकडून ५ पिस्तूल सह ७ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आरोपीकडे आणखी काही पिस्तुल आहेत का तसेच त्याने कोणाकोणाला पिस्तूल विकले होते याचा तपास सुरू आहे.
Ans: शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद याला पोलिसांनी अटक केली.
Ans: आरोपीकडून काय जप्त करण्यात आले?
Ans: आरोपी Instagramसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पिस्तुलांच्या खरेदी-विक्रीसाठी संपर्क साधत होता.






