Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; चाकूने वार करत 40 हजारांची खंडणी उकळली, अन्…

ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून गिरनेरा तांडा येथील शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला जालन्यात डांबून ठेवले. 40 हजार रुपये उकळल्यानंतर सातारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 03:01 PM
ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण (Photo Credit- AI)

ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण
  • चाकूने वार करत ४० हजारांची खंडणी उकळली
Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Case: ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून एका शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला चाकूने जखमी करत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना वळदगाव परिसरात उघडकीस आली आहे. आरोपींनी पीडिताला वाहनात जबरदस्तीने बसवून वेगवेगळ्या ठिकाणी नेत धमकावले आणि शेवटी फोन पेद्वारे 40 हजार रुपये उकळून बॉन्ड लिहून घेत धमकी देत सोडून दिले. ही घटना 15 मार्च रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास वळदगाव परिसरात घडली. अचिन जयंत चव्हाण, सचिन जयंत चव्हाण (दोघे रा. भासुनाईक तांडा ता. अंबड जि. जालना) आणि त्याचे सहा साथीदार अशी अपहरण करुन खंडणी उकळणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने अपहरण

प्रकरणात विलास गोविंद चव्हाण (35 रा. गिरनेरा तांडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांन फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे १५ मार्च रोजी रात्री वळदगाव परिसरात मिरची विक्री करून दुचाकीने (एमएच-20-एफके-4526) घरी परतत होते. साम्राज्य हॉटेलजवळ त्यांना अडवून चारचाकी व दुचाकीवरील सहा जणांनी रस्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर अचानक त्यांना शिवीगाळ, मारहाण करुन जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण करण्यात आले. दरम्यान, फिर्यादीने आरडाओरडा केल्याने आरोपींपैकी एकाने चाकूने फिर्यादीच्या उजव्या दंडवार वार करुन जखमी केले. त्यानंतर त्यांना झाल्टा फाटा येथे नेण्यात आले. येथे सचिन चव्हाण यांनी माझे पैसे का देत नाही, असे म्हणत मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Raigad Crime: बकरीच्या वादातून हत्या; 21 वर्षे फरार आरोपी अखेर जेरबंद, रायगड पोलिसांची मोठी कारवाई

शेतकऱ्याला पैशांसाठी दबाव, रूममध्ये डांबून ठेवले

त्यानंतर सहा आरोपींनी पुन्हा त्यांना शिवीगाळ दमदाटी करुन त्यांना वाहनात बसवून भासुनाईक तांडा (ता. अंबड, जि. जालना) येथे नेले. तेथे मारहाण करुन एका खोलीत डांबून ठेवत तुझ्या भावाने पैसे दिले नाहीत, आता तू आमचे पूर्ण पैसे दे, त्यानंतर तुला आम्ही सोडन अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी चव्हाण यांनी आपल्या भावाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या भावाने आरोपींना 40 हजार रुपये ऑनलाईन पाठवले.

बॉन्ड लिहून घेत धमकी

रक्कम घेतल्यानंतरही आरोपींनी उर्वरित पैशांसाठी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर बॉन्ड लिहून घेतला. तसेच ठरलेल्या तारखेला पैसे न दिल्यास तुला व तुझ्या भवाला खतम करुन टाकू अशी जीवे मारण्याची धमकी देत चव्हाण यांना सोडून दिले. घटनेनंतर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सातारा पोलिस ठाण्यात अचिन चव्हाण, सचिन चव्हाण व त्यांच्या सहा साथीदारांविरुद्ध अपहरण, मारहाण, खंडणी व धमकीचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गोविद एकीलवाले करीत आहेत.

Hyderabad Crime: 10 महिन्यांच्या लग्नाचा भयानक शेवट! गर्भवती सोशल मीडिया स्टारची निर्घृण हत्या; पती फरार

Web Title: Chhatrapati sambhajinagar farmer kidnapping case news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
1

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने  महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?
2

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
3

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
4

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.