Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!

मैत्रिणींसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे हवे होते, पण त्यासाठी तिघा तरुणांनी थेट दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. चोरीची मोपेड घेऊन ट्रिपल सीट जात असतानाच पोलिसांनी त्यांना अडवले आणि चौकशीत एकामागून एक तीन दुचाकी चोरीचा धक्कादायक खुलासा झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 01, 2026 | 01:32 PM
ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!

Follow Us
Follow Us:
  • मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी दुचाकी चोरी
  • ट्रिपल सीट जाताना तिघे पोलिसांच्या जाळ्यात
  • चोरीच्या तीन दुचाकी पोलिसांकडून जप्त
 

छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणींसोबत पैसे उडवून मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तीन तरुणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे. संजय विनोद जाधवर, सुशांत मंगेश भालेराव आणि युवराज विष्णू चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

ट्रिपल सीट प्रवास अन् पोलिसांना संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलिसांचे विशेष पथक पाम हॉटेल परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मोपेडवरून तिघेजण ट्रिपल सीट जाताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. चौकशीदरम्यान तिघांनी समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. त्यानंतर या मोपेडबाबत धक्कादायक माहिती समोर आली.

हेही वाचा: Crime News: ‘मंत्रजपाने आजार बरा करते’ म्हणत घरात शिरली; ओढणी उघडताच ७० वर्षीय आजीला बसला मोठा धक्का!

क्रांती चौकातून मोपेड चोरी केल्याची कबुली

पोलिसांच्या चौकशीत तिघांनी आपण ज्या मोपेडवरून प्रवास करत होतो, ती क्रांती चौक परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता टाऊन सेंटर परिसरातून आणखी दोन दुचाकी चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी तिन्ही आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

पायाने हँडलवर प्रहार, वायर डायरेक्ट करून दुचाकी सुरू

दुचाकी चोरीची आरोपींची पद्धतही तपासात समोर आली आहे. दुचाकीचे हँडल लॉक तोडण्यासाठी आरोपी पायाने हँडलवर जोरदार प्रहार करत होते. लॉक तुटल्यानंतर वायर डायरेक्ट करून दुचाकी सुरू केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर चोरीची दुचाकी घेऊन आरोपी पसार होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना

मौजमजेसाठी पैसे हवे होते

तिन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर चोरीमागील कारणही समोर आले. मैत्रिणींसोबत मौजमजा करण्यासाठी आणि त्यासाठी पैसे खर्च करण्याच्या उद्देशाने त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही वाहनचोरीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar three youths bike theft friends fun masti sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Arrested News
  • Bike Theft
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Crime . Crime News
  • Mharashtra
  • Youth

संबंधित बातम्या

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड
2

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना
4

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.