Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिबंधानंतरही खुलेआम विक्री; चायनीज मांजाने गळ्याभोवती घातला विखळा, मंत्र्यांच्या पुतण्याला गंभीर दुखापत

Chinese Manja Accident : भारतात चायनीज मांजावर बंदी असतानाही अनेक दुकानांमध्ये तो खुलेआम विकला जात आहे. बरेलीत या मांजामुळेच एक मोठा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात ऊस मंत्री संजय गंगवार यांच्या पुतण्यासोबत घडून आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 16, 2026 | 12:15 PM
प्रतिबंधानंतरही खुलेआम विक्री; चायनीज मांजाने गळ्याभोवती घातला विखळा, मंत्र्यांच्या पुतण्याला गंभीर दुखापत

प्रतिबंधानंतरही खुलेआम विक्री; चायनीज मांजाने गळ्याभोवती घातला विखळा, मंत्र्यांच्या पुतण्याला गंभीर दुखापत

Follow Us
Follow Us:
  • बंदी असलेल्या एका धोकादायक वस्तूमुळे अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
  • अपघातानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
  • घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी मोहीम अधिक कठोर करण्याचे संकेत दिले आहेत.
चायनीज मांजा हा नायलॉन आणि सिंथेटिकपासून तयार करण्यात आलेला दोरा असतो जो मानवासाठी किंवा जनावरांसाठी धोकादायक ठरु शकतो. या मांज्याची धार इतकी जबरदस्त असते की यामुळे सहज गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. याच्या घातक परिणामांमुळेच सरकारने चायनीज मांज्याच्या उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी घातली आहे. पण ही बंदी घातल्यानंतरही बाजारात आजही हा चायनीज मांजा सहज उपलब्ध आहे. यामुळेच उत्तर प्रदेशातील बरेलीत एक दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. ही दुर्घटना मंत्र्याच्या पुतण्यासोबत घडून आली.

Mumbai Crime: ‘CA’ नोकरीचे आमिष, लग्नाचे वचन अन् शोषण; मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप

गळ्याला दुखापत

बरेलीतील वर्दळीच्या भागांपैकी एक असलेल्या श्यामगंज उड्डाणपुलावर सोमवारी हा अपघात घडला. १५ वर्षीय किशोरवयीन वीर सिंह गंगवार बाईकने जात असतानाच अचानक चायनीज मांजाच्या कचाड्यात अडकला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. ही मांजा गळ्याभोवती अडकल्याने गळ्याला मोठी जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कशी घडली घटना

माहितीनुसार, वीर सिंह गंगवार आपल्या बाईकने स्टेडियमला जात होते, जेव्हा तो श्यामगंज फ्लाईओवरपर्यंत पोहचला तेव्हा अचानक हवेत लटकणारा चायनीज मांजा त्याच्या गळ्याभोवती येऊन अडकला. वीर वेगाने बाईक चालवत असल्यामुळे मांजा गळ्याभोवती वाईटरित्या अडकला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. गळ्याला मांजाने कट बसल्याने त्याला रक्तस्त्राव होऊ लागला आणि बाईकसोबतच वीर रस्त्यावर पडला. घटनास्थळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी कुटुंबाला संपर्क करत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवली ज्यानंतर काहीवेळाने वीरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी पसरताच, स्थानिक रहिवाशांनी आपला संताप व्यक्त केला असून बंदी असतानाही चिनी धागा उघडपणे कसा विकला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

मंत्री संजय गंगवारने दु:ख व्यक्त केले

घटनेची माहिती मिळताच ऊस मंत्री संजय गंगवार तात्काळ पिलीभीतहून बरेलीला पोहोचले. रुग्णालय गाठत त्यांनी डाॅक्टरांकडून उपचारांची चौकशी केली आणि कुटुंबाची भेट घेतली. घटनेविषयी दु:ख व्यक्त करताना मंत्री संजय गंगवार यांनी म्हटले की, सरकारने आधीच चायनीज मांजावर बंदी घातली आहे, परंतु यानंतरही अशा घटना घडणे ही चिंतेची बाब आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात प्रशासनाकडून उत्तरे मागितली जातील.

भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून

चायनीज मांज्याविरोधात आंदोलन

बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितले की, चायनीज मांजाविरोधात आधीच अभियान सुरु आहे, या घटनेनंतर ते  आणखी तीव्र केले जाईल. तसेच जिथेही चायनीज मांजा विकताना दिसेल तिथे कठोर कारवाई केली जाईल अशा विश्वास त्यांनी जनतेला दिला आहे .

 

Web Title: Chinese manja accident ministers nephew seriously injured despite ban illegal sale raises concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Accident
  • bareilly news
  • crime news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

मोक्कासह गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; शेतातून पळून जाताना सापळा रचून पकडले
1

मोक्कासह गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; शेतातून पळून जाताना सापळा रचून पकडले

भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून
2

भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून

Pune Crime : विश्रांतवाडीत टोळक्याचा राडा, दोघांवर वार अन् दहशतही; नेमकं काय घडलं?
3

Pune Crime : विश्रांतवाडीत टोळक्याचा राडा, दोघांवर वार अन् दहशतही; नेमकं काय घडलं?

Breaking: राजस्थानच्या बिकानेरमध्ये कार अन् ट्रकची भीषण धडक; ६ जणांचा जागेवरच मृत्यू
4

Breaking: राजस्थानच्या बिकानेरमध्ये कार अन् ट्रकची भीषण धडक; ६ जणांचा जागेवरच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.