Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळेगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात; नागरिकांचे गंभीर आरोप

बारामती तालुक्यातील माळेगाव तसेच माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध गावठी व देशी दारूच्या धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2026 | 12:30 AM
माळेगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात; नागरिकांचे गंभीर आरोप

माळेगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात; नागरिकांचे गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:

माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव तसेच माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध गावठी व देशी दारूच्या धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. विशेष म्हणजे या प्रकारांकडे संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

 

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील काही गावांमध्ये ओढे, नाले, कॅनल परिसर तसेच शेतशिवाराचा आधार घेत अवैध दारू गाळण्याचे आणि विक्रीचे प्रकार सुरू आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्त्यांच्या कडेला तसेच रहिवासी वस्त्यांच्या आसपास रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने दारूची विक्री केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या अवैध अड्ड्यांमुळे परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी, शिवीगाळ, वादविवाद आणि भांडणांचे प्रकार वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, अनेकांना सायंकाळनंतर बाहेर पडताना असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अवैध दारू विक्रीमुळे केवळ सामाजिक वातावरण बिघडत नसून अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि मानसिक नुकसानही होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

विशेषतः माळेगाव येथील महाविद्यालय परिसरालगत असलेल्या कॅनलच्या कडेला काही तरुण मद्यपान आणि इतर व्यसन करताना सर्रास आढळत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. शैक्षणिक वातावरणाला बाधा आणणारे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, अवैध दारू विक्री आणि व्यसनाधीनतेमुळे परिसरातील युवक चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत. अनेक वेळा नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत असतानाही या धंद्यांवर कायमस्वरूपी आळा बसताना दिसत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे विधानपरिषद उमेदवारीवरून मोठा गोंधळ, विक्रम काकडेंना मिळाली उमेदवारी तर सुनील टिंगरेंची बंडखोरी

ग्रामस्थ, महिला आणि विविध सामाजिक संघटनांनी माळेगाव पोलीस प्रशासनाने या अवैध अड्ड्यांवर तातडीने धाडसत्र राबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच गावागावांत नियमित गस्त, संशयित ठिकाणांची तपासणी आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती मोहीम राबविण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Citizens have alleged that illegal businesses are operating in the malegaon area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • baramati
  • Malegaon
  • Pune Police

संबंधित बातम्या

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
1

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना पुणे पोलिसांचा दणका; 9 महिन्यांत 105 आरोपींना अटक
2

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना पुणे पोलिसांचा दणका; 9 महिन्यांत 105 आरोपींना अटक

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी
3

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी

Baramati Agricultural News:बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव
4

Baramati Agricultural News:बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.