Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fadnavis On Yawat Voilence: “दोन्ही समाजाची लोकं…”; यवतच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

यवतमध्ये दोन गट आमने-सामने आले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2025 | 05:52 PM
Fadnavis On Yawat Voilence: "दोन्ही समाजाची लोकं..."; यवतच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Fadnavis On Yawat Voilence: "दोन्ही समाजाची लोकं..."; यवतच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:

यवत: यवतमध्ये एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या राड्यामध्ये काही दुचाकी जाळण्यात आल्या. यवतमधील बाजारपेठ बंद झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यवतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा अधिक लोक एकत्रित येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान यवतमध्ये झालेल्या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

मी यवतमध्ये घेतलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. एका बाहेरील व्यक्तीने चुकीची पोस्ट टाकल्याने आणि एका पुजाऱ्याने बलात्कार केल्याचा स्टेट्स ठेवल्याने तणाव निर्माण झाला. यामुळे काही लोक रस्त्यावर जमा झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला आहे. दोन्ही समाजाची लोक एकत्रितपणे बसून तणाव संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही लोक तणाव निर्माण व्हावा यासाठी जाणीवपूर्वक स्टेट्स ठेवत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. चुकीच्या पद्धतीने टीका करण्याचे अधिकारी कोणालाही नाहीत. या सर्व घटनेची चौकशी केली जाणार आहे. सर्वानी शांतता ठेवली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. कुणी बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

दौंडचे आमदार राहुल कुल काय म्हणाले?

साधारणपणे गेले तीन ते चार दिवस सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी आम्ही आवाहन करत होतो. आजही मी तेच आवाहन करेन. जे चुकीचे वागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. लोकांनी संयमाने घ्यावे असे आवाहन करतो. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे.

Yawat Voilence: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अन् यवतमध्ये जोरदार राडा, पोलिसांनी थेट…

काही दिवसांवपूर्वी यवतमध्ये एका मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आज यवतमध्ये एका सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गट आमने-सामने आले. अनेक दुचाकी पेटवून देण्यात आल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर?

छत्रपती शिवाजी महाराज हे या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मियांचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सर्व लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्रित येऊ शकतात हे त्यांना माहिती आहे. मग त्या अस्मितेवर घाला घालायचा. ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

Web Title: Cm devendra fadnavis reply to yawat voilence daund pune crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • crime news
  • Police News
  • Yavat

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
3

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
4

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.