Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने २५ लाखांना गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सुधाकर जाधव यांच्या नावे बँक खात्यामध्ये २ कोटींचे मनी लॉन्ड्रिग झाले आहे. त्याबाबत खारघर येथे तक्रार नोंद असल्याचे खोटे सांगून चौकशीसाठी हजर राहावे लागेल, असे सांगण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 02:42 PM
Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने २५ लाखांना गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

तिघांवर जयगड ठाण्यात गुन्हा दाखल
‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने २५ लाखांना गंडा
पोलिस असल्याचे भासवून केली फसवणूक

रत्नागिरी: वारंवार फोन करून आतंकवादी सहभाग, बैंक खात्यामध्ये २ कोटींचे मनी लॉन्ड्रिग झाले आहे, असे सांगून आणि नाशिक पोलिस असल्याचे भासवून २५ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दि. १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत तालुक्यातील जयगड-साखरी बौद्धवाडी येथे ही घटना घडली. फिर्यादी सुधाकर लक्ष्मण जाधव (वय ६१, रा. जयगड, साखरी बौद्धवाडी, रत्नागिरी) यांना अनोळखी तिघांनी वारंवार फोन करून नाशिक पोलिस असल्याचे भासविले. त्यांचा आतंकवादी हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचे सांगितले.

सुधाकर जाधव यांच्या नावे बँक खात्यामध्ये २ कोटींचे मनी लॉन्ड्रिग झाले आहे. त्याबाबत खारघर येथे तक्रार नोंद असल्याचे खोटे सांगून चौकशीसाठी हजर राहावे लागेल. व्हॉटसअॅप कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट राहावे लागेल. फिर्यादीच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया येथे तपासण्यासाठी जमा करावे लागतील, असे सांगून फसविले. पोलिस ठाण्याचा लोगो असलेले त्यावर फिर्यादीचे नाव, आधार कार्ड क्रमांक व फोटो असलेले बनावट पत्र पाठवून सुधाकर जाधव यांच्याकडून २५ लाख २७ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरणा करण्यास सांगून फसवणूक केली.

डिजिटल अरेस्टच्या नावावर दोघांना गंडा; तब्बल दोन कोटींची केली फसवणूक

डिजिटल अरेस्टच्या नावावर दोघांना गंडा

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. फसवणुकीच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता जनजागृती आणि वारंवार सतर्क केल्यानंतरही लोक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. शहरात अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली.

आता सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यासह दोघांना जवळपास 2 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले. पीडित 62 वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकारी प्रतापनगर ठाण्यांतर्गत राहतात. 6 नोव्हेंबरला विनिता शर्मा आणि प्रेमकुमार गौतम नावाच्या दोन गुन्हेगारांनी त्यांना दोनदा व्हॉट्सअॅप कॉल केले.

हेदेखील वाचा : NPCI ने जारी केला अलर्ट, ‘Digital Arrest’ स्कॅमपासून सावध राहा! या कॉल्सना उत्तर दिल्यास होईल मोठं नुकसान

दहशतवादी विरोधी पथकाचा (एटीएस) अधिकारी असल्याचे सांगून पीडिताचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आले असून, त्यांना अटक करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडिताने अटक न करण्याची विनंती केली. दरम्यान, आरोपींनी एक कोटीची मागणी करून त्यांना डिजिटल अरेस्ट केले. तेव्हा पीडित व्यक्तीने त्यांच्याजवळ इतके पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी नवा बहाणा करत पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केला.

 

Web Title: Criminals fraud with 25 lakhs digital arrest jaigad ratnagiri crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Digital Arrest

संबंधित बातम्या

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
1

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
2

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Mahanagar Gas : तुम्ही महानगर गॅसधारक आहात? तर, ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे..!
3

Mahanagar Gas : तुम्ही महानगर गॅसधारक आहात? तर, ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे..!

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
4

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.