Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: टेलिग्रामवर बाल अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार; बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक

छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांनी टेलिग्रामवर बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ विकणाऱ्या बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये एका फोटोसाठी ५ रुपये, तर व्हिडिओसाठी १०० ते ४९९ रुपये घेतले जात होते. तपासात ३,०४१ संशयित व्हिडिओंचे धागेदोरे समोर आले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 05, 2026 | 08:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • टेलिग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ विकणाऱ्या दोन बी.कॉम. विद्यार्थ्यांना अटक.
  • एका फोटोसाठी ५ रुपये, तर एका व्हिडिओसाठी १०० ते ४९९ रुपये आकारून बेकायदेशीर कमाई.
  • तांत्रिक तपासात ३,०४१ संशयित व्हिडिओंचे धागेदोरे; सुमारे २०० व्हिडिओ जप्त, पुढील फॉरेन्सिक तपास सुरू.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर पोलिसांनी अत्यंत धक्कादायक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर आणि टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंची विक्री करणाऱ्या बी.कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. झटपट पैशांच्या मोहापायी गेल्या दीड वर्षांपासून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचा प्राथमिक तपासात दावा करण्यात आला असून, या प्रकरणात हजारो संशयित व्हिडिओंचे धागेदोरे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

एका फोटोसाठी ५ रुपये, व्हिडिओसाठी ४९९ रुपये

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी एका फोटोसाठी ५ रुपये, तर एका व्हिडिओसाठी १०० ते ४९९ रुपये आकारत होते. विक्रीतून मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत होती. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी क्लाऊडवरील डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक तपासात तब्बल ३,०४१ संशयित व्हिडिओंचे धागेदोरे समोर आले. त्यापैकी सुमारे २०० व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून, उर्वरित डेटा फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

9 महिन्यांच्या बाळाचे तोंड फेव्हीक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न; पुण्यात महिलेचं संतापजनक कृत्य

चार दिवसांत दुसरी मोठी कारवाई

विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. इंटरनेटचा गैरवापर, झटपट पैशांचा मोह आणि वाढते सायबर गुन्हे यामुळे तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १० वर्षांच्या चिमुकलीला १०० रुपयांचे आमिष दाखवून रिक्षात ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि दाखवलेल्या धैर्यामुळे एका चिमुकलीचे प्राण व भविष्य वाचले असून अपहरणाचा हा भयानक डाव उधळला गेला आहे. घडलेली घटना ही गजबजलेल्या शाहगंज बाजारात घडली.

Pune Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण होते?

    Ans: बी.कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकणारे दोन विद्यार्थी.

  • Que: आरोपी कोणत्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ विकत होते?

    Ans: टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून.

  • Que: पोलिसांच्या तपासात किती संशयित व्हिडिओंचे धागेदोरे समोर आले?

    Ans: ३,०४१ संशयित व्हिडिओ.

Web Title: Cyber crime black market for child pornography videos on telegram two bcom students arrested by cyber police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • crime
  • cyber
  • cyber crime

संबंधित बातम्या

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
1

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.