Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime News : निवृत्त शिक्षकाची फसवणूक; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून लुटले

सायबर भामट्यांनी तब्बल ९७ लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सेलु पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 13, 2026 | 05:07 PM
Cyber crime by showing fear of digital arrest to 70-year-old retired teacher crime news

Cyber crime by showing fear of digital arrest to 70-year-old retired teacher crime news

Follow Us
Follow Us:

Crime News : सेलू : सेलू शहरातील एका ७० वर्षीय निवृत्त शिक्षकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची (Cyber Crime) भीती दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल ९७ लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सेलु पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.

 

मौलाना आझाद नगर येथील रहिवासी नागनाथ शंकरराव कुरमुडले (७०, निवृत्त शिक्षक) यांना ४ मार्च ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध मोबाईल क्रमांकावरून फोन आले. आरोपींनी ‘रवि शर्मा’ व इतर असल्याचे भासवून फिर्यादीला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. तुमच्या आधार कार्डचा वापर करून मुंबईत सीम कार्ड काढण्यात आले असून, कॅनरा बँकेच्या खात्यावरून दोन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. तुम्ही नरेश गोयल याला पैसे पाठवून २० लाख रुपये कमिशन घेतले आहे, अशी खोटी बतावणी आरोपींनी केली. अटक करण्याची भीती दाखवून आणि फिर्यादीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती काढून आरोपींनी त्यांना मानसिक दबावाखाली ठेवले.

हे देखील वाचा : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही

नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन
कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून अशा प्रकारे व्हिडिओ कॉलवर कोणालाही ‘डिजिटल अरेस्ट’ केले जात नाही. पैशांची मागणी करणाऱ्या संशयास्पद फोन कॉल्सना बळी पडू नका आणि त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पोलिस तपासाला वेग; आरोपींचा शोध सुरू

आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या पोस्टातील एफडी (FD) मोडायला लावल्या, पेन्शनवर कर्ज घेण्यास भाग पाडले, इतकेच नव्हे तर त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यावरही कर्ज काढायला लावले, ही रक्कम वेळोवेळी आरटीजीएस (RTGS) आणि चेकद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरून घेतली. ही घटना कोणाला सांगितली तर तुमची पेन्शन बंद करू आणि तुमच्या मुलाची नोकरी घालवू, अशी धमकीही आरोपींनी दिली होती. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. या फसवणुकीत फिर्यादीचे एकूण ९७ लाख ८३ हजार रुपये गेले आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून सेलु पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४), ३५१(२) (३), ६१ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम -६६ (सी), ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील पुंगळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा : “खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडीओ आहेत का? रोहित पवारांच्या प्रश्नांने उंचावल्या भुवया

 

Web Title: Cyber crime by showing fear of digital arrest to 70 year old retired teacher crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • crime news
  • Cyber Fraud
  • nanded news

संबंधित बातम्या

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा
1

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
2

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
3

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले
4

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.