Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्वीशा शर्मा प्रकरणाची पुनरावृत्ती! 3 कोटींच्या हुंड्यानंतर केली 2 कोटींची मागणी, मुलीने संपवलं आयुष्य; सैनिक नवऱ्यावर FIR दाखल

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील व्यावसायिकाने आपल्या मुलीचे लग्न लष्करात मेजर पदावर कार्यरत असलेल्या ओमसोबत लावून दिले होते. लग्नात कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्यानंतरही जावई आणखी २ कोटींची मागणी करत होता. ही रक्कम माहेरहून आणण्यास मुलगी कविता हिने नकार दिल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आ

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2026 | 03:27 PM
ट्वीशा शर्मा प्रकरणाची पुनरावृत्ती! 3 कोटींच्या हुंड्यानंतर केली 2 कोटींची मागणी, मुलीने संपवलं आयुष्य; सैनिक नवऱ्यावर FIR दाखल

ट्वीशा शर्मा प्रकरणाची पुनरावृत्ती! 3 कोटींच्या हुंड्यानंतर केली 2 कोटींची मागणी, मुलीने संपवलं आयुष्य; सैनिक नवऱ्यावर FIR दाखल

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांत विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
  • हुंडा, वैवाहिक मतभेद आणि कथित मानसिक छळ यांमुळे हे प्रकरण अधिकच गाजत असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
  • मृत्यूच्या वेळ, उपचार प्रक्रिया आणि तपासाच्या दिशेबाबत कुटुंबीयांनी शंका उपस्थित करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील ट्वीशा शर्मा प्रकरणं चांगलंच तापलं असून अलिकडे अशीच एक घटना समोर आली आहे. सदर घटना मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून समोर येत आहे. चेन्नईतील व्यावसायिक पी. दक्षिणामूर्ती यांची २७ वर्षीय मुलगी कविता हिचा सासरी संशयास्पद मृत्यू झाला. लग्नाच्या वर्षभरातच मुलीचा असा मृत्यू झाल्याने वडिल हादरले आणि त्यांनी पोलिस ठाण्यात जबलपुरच्या एडीजे कोर्टात धाव घेतली. वडिलांचा आरोप आहे की, सैन्यात मेजर आणि डाॅक्टर असलेल्या त्यांच्या जावयाने २ कोटींचा हुंडा न मिळाल्याने मुलीचा जीव घेतला. प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी ३ जून २०२६ रोजी पार पडली.

UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार

करोडोंचे गिफ्ट देऊनही आणखी पैशांची मागणी

पिडित वडिल पी. दक्षिणामूर्ति यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, त्यांनी २ मार्च २०२५ रोजी आपली एकुलती एक लेक कविता हिचे लग्न तामिळनाडूत राहणाऱ्या डॉ. ओम नागार्जुन याच्यासोबत लावून दिले होते. ओम सध्या जबलपूर येथील जेकेआरआरसीमध्ये मेजर पदावर कार्यरत आहे. त्यांनी आरोप लावला की, लग्नानंतर कविताता सासरी छळ केला जात होता. जावई ओम याला आपले नवीन हाॅस्पिटल ओपन करायचे होते ज्यासाठी त्याने कवितावर दबाव आणला. कविताने जेव्हा माहेरी जाऊन पैसे आणण्यास नकार दिला त्यानंतर तिचा संशयास्पद मृत्यू घडला.

वडिलांचा जावयावर आरोप

या प्रकरणात मृत महिलेच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूचा आरोप जावयावर लावला आहे. त्यांनी सांगितले की, लग्नानंतर कविताचे मानसिक शोषण केले जात होते. लग्नाच्या तीन महिन्यांनंतरच नागार्जुनाने कविताशी बोलणे कमी केले. त्याचा जास्त वेळ इंदाैरच्या एका महिला मैत्रणीशी बोलण्यात जात होता. काॅल रेकाॅर्ड्सचा हवाला देत वडिलांनी आरोप केला की, जावई १०० तासांहून अधिक वेळ त्या महिला मैत्रिणीसोबत घालवत होता.

प्रकरणावर उपस्थित अनेक प्रश्न

कविताचा मृत्यू १० जून २०२५ रोजी सकाळी झाला. परंतु याची टाईमलाईन अनेक प्रश्न उपस्थित करते. याचिकेनुसार, ९ मार्च २०२५ रोजी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ओम नागार्जुन आपली पत्नी कविता हिला गंभीर अवस्थेत जबलपुरच्या मिलिट्री हाॅस्पिटलमध्ये घेऊन आला. डॉक्टरच्या बंगल्यावर तैनात असलेल्या चौकीदाराच्या जबाबानुसार, मेजर रात्री सुमारे १० वाजता आपल्या जखमी पत्नीला घेऊन गाडीतून घरातून निघाले आणि रात्री सुमारे १ वाजता रुग्णालयात पोहोचले. अशात दक्षिणामूर्ति यांच्या वकिलाने प्रश्न उपस्थित केला की, ५ मिनिटांच्या अंतरावर असलेले हाॅस्पिटल गाठायला मेजरला तीन तासांचा अवधी का लागला.

रुग्णालयात पोहचल्यानंतर मेजर जावईवर डाॅक्टरांची दिशाभूल करण्याचाही आरोप लावण्यात आला आहे. सांगितलं जातंय की, ओमने डाॅक्टरांना सांगितले की, कविताच्या घरी आधीपासून डायबिटिज आणि हृदयाच्या आजाराचा इतिहास आहे ज्यामुळे डाॅक्टरांनी तिला कार्डियक अरेस्ट आला असावा हे समजून तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली आणि काही वेळातच कविता कोमात गेली. यानंतर सकाळी तिची मृत्यू झाला. ही माहिती मिळाल्यावर, गोराबाजार पोलीस ठाण्याने केवळ गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मेजरने आपल्या ओळखीचा फायदा घेत पत्नीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे असा खोटा अहवाल तयार केल्याचा आरोपही त्याच्यावर लावण्यात आला आहे.

गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड; दौंड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल…

वडिलांची न्यायासाठी मागणी

पिडित वडिलांनी सांगितले की, मागील एक वर्षापासून ते जबलपूर पोलिसांकडे उच्च स्तरीय कारवाईची आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती करत आहेत. परंतु दबावामुळे पोलिस या प्रकरणावर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाहीत. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी याआधीही प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती पण तिथून दिलासा न मिळाल्याने त्यांनी आता जिल्हा न्यायालयात पुनरीक्षण याचिका दाखल केली आहे.

Web Title: Daughter death case father accuses army major son in law for dowry harassment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • crime news
  • Dowry Prevention Act
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड
1

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड; दौंड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल…
2

गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड; दौंड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल…

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
3

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

हिंजवडी येथील आयटी कंपनी रातोरात बंद; पोलिसांनी ‘थिंकटेक’च्या मालकाला नाशिकमधून पकडले
4

हिंजवडी येथील आयटी कंपनी रातोरात बंद; पोलिसांनी ‘थिंकटेक’च्या मालकाला नाशिकमधून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.