(फोटो सौजन्य: Pinterest)
कुठे घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सदर कोतवाली परिसरातील आझादपुरा भागातून समोर येत आहे. इथे ‘अरविंद चाट’ या नावाने दुकान चालवणाऱ्या राहुलवर सनकी आशिककडून हल्ला करण्यात आला. सांगितलं जातंय की, आरोपीने कोणत्याही भितीशिवाय दुकानदारावर चाकूने अनेक वार केले आणि नंतर तो तिथून पळून गेला.
पिडित राहुलने सांगितले की, त्याने आपल्या दुकानावर आरोपीच्या प्रेयसीला पाणीपुरी खाऊ घातली होती. यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा तो घरी परतत होतो तेव्हा रस्त्यात आरोपीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. राहुलने सांगितले की, त्याला हे देखील माहिती नव्हते की त्या तरुणीचे आरोपीसोबत कोणते नातेसंबंध आहेत आणि कोणत्या कारणासाठी त्याच्यावर हल्ला केला जात आहे.
पोलिसांद्वारे आरोपीचा शोध सुरु
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी घायाळ दुकानदाराला रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. डाॅक्टरांच्या मते, धारदार शस्त्राने पिडितावर हल्ला करण्यात आला ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. सध्या तो धोक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.
खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?
दरम्यान पोलिसांनी सांगितले की, त्यांना पीडित किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही लेखी तक्रार मिळालेली नाही. तक्रार दाखल होताच या प्रकरणावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या पोलिसांचे पथक आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. उघड हल्ल्यांचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






