Mumbai Police Gets Call Threat: मुंबईत आज दुपारी १२.५७ वाजता शहरातील रुग्णालयाला फोनवरून बॉम्बची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जारी केलेल्या निवेदनानुसार हे प्रकरण सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाशी (Sir HN Foundation Hospital) संबंधित आहे. अचानक हॉस्पिटलच्या लँडलाईनवर फोन वाजला. फोन करणाऱ्याने हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली.
याआधीही रिलायन्स फाऊंडेशनच्या या हॉस्पिटलच्या लँड लाईनवर कॉल आला होता आणि फोन करणाऱ्याने अंबानी कुटुंबाला धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
ऑगस्ट महिन्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेललाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५ कोटींची मागणी केल्याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यातही घेतले होते. याप्रकरणी हॉटेल प्रशासनाकडे कॉलद्वारे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर ३ कोटींची मागणी करण्यात आली. स्फोट होऊ नये म्हणून हॉटेल प्रशासनाला ५ कोटी द्यावे लागतील, अशी धमकी एका व्यक्तीने फोनवर दिली होती.