दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) गेल्या 8 वर्षांपासून दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या (Ghaziabad) लोनी परिसरात (Loni Area) बनावट नोटा (Fake Notes) छापून त्याची विक्री (Sale) करणाऱ्या एका व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. 2018 मध्ये पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली होती. दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर आरोपी कारागृहातून बाहेर येताच त्याने बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्याकडून जेवढे साहित्य जप्त केले आहे, त्यावरून सुमारे ५ कोटींच्या बनावट नोटा छापल्या जाऊ शकतात.
आरोपी प्रशांत उर्फ विशाल हा चेन्नईचा रहिवासी आहे. कामाच्या शोधात तो 2013 साली दिल्लीत आला होता. येथे विशाल एसी मेकॅनिक म्हणून काम करू लागला. 2015 मध्ये विशालला गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह अटक केली होती. त्यानंतर त्याची डासना कारागृहात रवानगी करण्यात आली. विशालची कारागृहात अमित नावाच्या कैद्याशी भेट झाली.
[read_also content=”आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल जाहीर, यंदाच्या निकालातही मुलींचाच वरचष्मा https://www.navarashtra.com/education/icse-ssc-and-isc-hsc-exam-results-announced-this-years-result-too-girls-are-at-the-top-nrvb-399279.html”]
अमितने विशालला बनावट नोटा छापायला शिकवले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विशालने बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये पोलिसांनी त्याला बनावट नोटांसह अटक केली होती. पकडल्यानंतर विशाल जवळपास 2 वर्षे तुरुंगात राहिला आणि 2020 मध्ये बाहेर आला. यानंतर पुन्हा एकदा त्याने गाझियाबादच्या लोणी परिसरात ठाण मांडले आणि बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनुसार, त्यांना कोणीतरी बनावट नोटांच्या व्यवसायात गुंतल्याची माहिती मिळाली होती. तो केवळ 500 नाही तर 2000 च्या बनावट नोटा छापत आहे. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता विशाल नावाची व्यक्ती हे नेटवर्क चालवत असल्याचे आढळून आले.
विशाल दिल्लीतील इंद्रप्रस्थ पार्कजवळ बनावट नोटा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या भागात टेहळणी सुरू केली आणि विशालला तेथे पोहोचताच पकडले. विशालकडून सुमारे 2 लाख किमतीच्या 500 आणि 2000 च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 14 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-14-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
दिल्ली पोलिसांचे पथक लोणीतील विशालच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तेथील सेटअप पाहून पोलिसांचे पथक चक्रावून गेले. प्रथम, पोलिसांनी तेथून 4 लाख 70 हजार छापील बनावट नोटा जप्त केल्या.
जप्त करण्यात आलेल्या नोटा 200, 500 आणि 2000 च्या होत्या. याशिवाय पोलिसांनी कागद, धागा आणि रंग जप्त केला असून, या साहित्यासह विशालने पाच कोटींच्या बनावट नोटा छापल्या असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल या बनावट नोटा पुढे ३० टक्के किमतीत विकायचा.