काय घडलं नेमकं?
सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी शिवारात कदम यांची शेती आहे, ती शेती दत्ता कोरे हा बटईने करत होता. सदर ठिकाणी उमरगा तालुक्यातील कोळसुर येथील ओमकार देवीदास कांबळे हा भावजयीला घेवून सालगडी म्हणून कामास होता. भावजयी ज्योती कांबळे हीचा १३ वर्षाचा मुलगा कृष्णा सदानंद कांबळे हा कधी वडीलाकडे गावी तर कधी त्यांच्यासोबत राहायचा. मुलगा कृष्णा हा चुलता व आई यांच्या अनैतिक संबधाची माहिती वडील सदानंद कांबळे यांना सांगत होता.
याचाच राग मनात धरून आरोपी ओंकारने कृष्णाचा काटा काढण्याचा कट रचला. त्याने 01 जानेवारी रोजी दुपारी १२च्या सुमारास तामलवाडी साठवण तलावामधील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंम्पाचा पाईप बसवायचा म्हणून तलावाच्या परिसरात कृष्णाला घेवून गेला. तिथे त्याने कृष्णावर कुऱ्हाडीने वार केले. कृष्णा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्याचा मृतदेह गवतामधे फेकुन दिलं आणि तो तेथुन पसार झाला होता.
२४ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
पोलिसांना ५ जानेवारीला कृष्णाचा मृतदेह आढळून आला. तामलवाडी पोलीसांनी पहिल्यांदा अकस्मात मृत्युची नोंद केली आणि तपासाला सुरुवात केली. मृतकाची आधी ओळख पटवून गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषनावरुन ओमकार देविदास कांबळे याचा शोध घेवून उमरगा तालूक्यातील काळसुर गावातून ताब्यात चौकशी केली, त्यावेळी त्याने हा गुन्हा केल्याचा कबुली जबाब दिला आहे. अवघ्या २४ तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…
Ans: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे.
Ans: आई आणि चुलता यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती वडिलांना देत होता.
Ans: ओमकार देवीदास कांबळे (चुलता).






