Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

शफिक अन्सारी याने फिर्यादीचा हात पकडला, मोसीन शेख याने लाकडी दांडक्याने तर गुलाम जाफर कुरेशी याने कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच साबीर जाफर कुरेशी आणि शफिक अन्सारी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 02, 2026 | 03:17 PM
पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : पत्नीला घरी आणण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन घरात घुसून मारहाण करण्यापर्यंत झाल्याची घटना वडगाव आनंद येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आता याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलीम अब्दुल कुरेशी (वय २९, रा.वडगाव आनंद, ता.जुन्नर) हे वेल्डिंग व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, पत्नी सुमय्या या गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी राहत असल्याने त्यांना घरी आणण्यासाठी ते रात्री गेले होते. त्यावेळी पत्नी व साडू मोसीन जाकीर शेख यांच्यासोबत वाद झाला.

Ketan Agrawal Muder Case : सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

दुसऱ्या दिवशी, सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी घरी असताना मोसीन जाकीर शेख याने दरवाजाला लाथ मारून घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत गुलाम जाफर कुरेशी, साबीर जाफर कुरेशी आणि शफिक अन्सारी यांनीही घरात प्रवेश करून संगनमताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शफिक अन्सारी याने फिर्यादीचा हात पकडला, मोसीन शेख याने लाकडी दांडक्याने तर गुलाम जाफर कुरेशी याने कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच साबीर जाफर कुरेशी आणि शफिक अन्सारी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर फिर्यादीने डायल ११२ वर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधितांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर फिर्यादीने प्राथमिक आरोग्य केंद्र आळे येथे उपचार घेतले. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार थोरात करत आहेत.

चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण

मोबाईल चोरत असल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३०) रात्री एक वाजण्याच्या सुमारास चाकण येथील आंबेठाण चौकाजवळील संकल्प हॉटेलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

Web Title: Dispute arose over bringing the wife home incident in alephata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
1

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
2

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
4

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.