काय घडलं नेमकं?
तीन वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर २३ वर्षीय तरुणीने दुसऱ्याच तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या नवसागर बोरकर (26) प्रियकराने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला त्यांचे फोटो पाठवले. नवसागर ने सांगितले की त्याची प्रेयसी अनेकदा लग्नाबद्दल बोलायची आणि वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी करायची. नवसागर तिला ऑनलाईन तर कधी रोख पैसे देखील द्यायचा अशी माहिती समोर आली आहे.
प्रेयसी दुसऱ्याच तरुणाशी बोलायची आणि नवसागरकडे दुर्लक्ष करायची. नवसागरला हे लक्षात आल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधणे बंद केले आणि पैशांची मागणी केली, तिने पैसे परत देण्यास नकार दिला. संतापलेल्या नवसागर बोरकरने 11 फेब्रुवारी रोजी प्रेयसीचे ज्या तरुणाशी प्रेमसंबंध होते त्या तरुणाला दोघांचे फोटो पाठवले.
12 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजता, शेतातील काम संपवून ट्रॅक्टरने गावी परतताना महिलेचे जवळचे नातेवाईक सोमेश्वर ठिकरे, प्रकाश ठिकरे आणि वाढोना येथील रहिवासी असलेले घोनमोडे यांनी एका हॉटेलजवळ तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, नंतर त्याला दोरीने बांधून त्याचे कपडे फाडले. अनिल ठिकरे यांच्या पत्नीने तरुणाला चप्पलने बेदम मारले, त्यांचा मुलगा राहुल ठिकरे यांनी त्याच्या डोक्यावर पाणी ओतून बेदम मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच वडील गुरुदास बोरकर, चुलत भाऊ दिनेश बोरकर, स्वप्नील बोरकर यांनी त्याला ठिकरे कुटुंबियांच्या तावडीतून कसेबसे सोडवले. पोलिसांनी सावरगाव येथील रहिवासी सोमेश्वर ठिकरे, प्रकाश ठिकरे, प्रमोद घोनमोडे, अनिल ठिकरे, राहुल ठिकरे, अनिलची पत्नी आणि आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या
Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील सावरगाव परिसरात.
Ans: प्रेयसीचे फोटो दुसऱ्या तरुणाला पाठवल्याचा राग.
Ans: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.






