crime (फोटो सौजन्य: social media)
गेल्या काही दिवसांमध्ये अटल सेतूवर वारंवार होणाऱ्या आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहेत. अश्यातच आता अटल सेतूवरून एका डॉक्टरने उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून अद्याप या डॉक्टरचा शोध लागलेला नसल्याची माहिती आहे. आत्महत्या करणारा डॉक्टर हा जे.जे. रुग्णालयात कार्यरत आहे. डॉक्टरला पुलावरून खाडीत उडी मारतांना एका व्यक्तीने बघितले. त्याने तात्काळ पोलिसांना फोन करून कळवले. तेव्हा हा प्रकार उजेडात आला आहे.
पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच…
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठत तपास केला आहे. पुलावर चारचाकी आणि मोबाईल मिळाला आहे. यात डॉ. ओंकार भागवत कवितके (वय 32) असे असे अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ओंकार कवितके हे जे.जे. रुग्णालयात डॉक्टर पदावर कार्यरत आहेत. ओंकार हे कळंबोली येथील रहिवाशी आहे. सोमवारी रात्री ते अटल सेतूवर आले आणि त्यांनी गाडी थांबवत क्षणात खाडीत उडी मारली. ध्रुवतारा बोटला शोधण्यासाठी रवाना करण्यात आली. घटनास्थळावरून होंडा अमेझ आणि एक आयफोन मिळालेलं आहे. खाडीमध्ये ओंकार कवितके यांचा शोध घेतला जात आहे. त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला. याबद्दलही आता पोलीस तपास करत आहे.
आईला केला शेवटचा कॉल, आणि….
डॉक्टर ओंकार भागवत कवितकेने आईला शेवटचा कॉल केला होता. सोमवारी रात्री 9.11 वाजता त्याने आईला लवकरच जेवणासाठी घरी येत असल्याचे सांगितले होते. असे उलवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजणे यांनी सांगितलं.
Crime News: चोरटे घरात शिरले, लोखंडी गज घेतला अन्….
देऊळगावराजे: दौंड तालुक्यातील देऊळगावराजे येथे राहत्या घरी मंगळवारी( दि ८) मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पत्नी नंदा आवचर या जेष्ठ दांपत्यास लोखंडी गजाने जबर मारहाण केली. तसेच घरातील सात हजार रुपये रोख रक्कम व अंदाजे तीन तोळे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
पोपट अप्पासाहेब आवचर ( वय ७५ ) व त्यांच्या पत्नी नंदा (६५ ) हे कुंटुब रात्री जेवण करुन घरामध्ये झोपले होते. मंगळवारी (दि ८) मध्यरात्री बारा ते एक वाजण्याच्या आसपास तीन ते चार चोरटयांनी कटावणीच्या साहयाने दरवाजाची आतील कडी तोडुन घरात प्रवेश केला. त्यांनी पोपट अवचर व त्यांच्या पत्नी झोपेत असतानाच लोखंडी गजाने मारहाण केली . तसेच ओरडाओरडा केल्यास आणखी मारण्याची धमकी दिली. घरातील रोख रक्कम सात हजार रुपये व अंदाजे तीन लाख किंमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करुन चोरटे पसार झाले. काही वेळाने अवचर यांनी शेजारी फोन केला. आवचर व त्यांच्या पत्नी यांच्या डोक्याला आणि कानाजवळ चोरटयांनी गंभीर मारहाण केल्याने त्यांना मोठी दुखापत झाली आहे.
पुण्यात टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार केले अन्…