Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime : सायबर फसवणुकीचा नवा प्रकार! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंट, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Karthikeyan S यांच्या नावाने आणि छायाचित्राचा वापर करून बनावट सोशल मीडिया खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या खात्यामार्फत काही नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचे उघड झाले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 25, 2026 | 06:07 PM
सायबर फसवणुकीचा नवा प्रकार! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंट, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

सायबर फसवणुकीचा नवा प्रकार! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंट, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
  • व्हिएतनाम-थायलंडमधून फसवणुकीचा प्रयत्न
  • पैशांची मागणी केल्याप्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार
सोलापूर, शहर प्रतिनिधी : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलीकडील प्रकरणांमध्ये ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली लाखो रुपयांचे फसवणुकीचे व्यवहार, फसव्या गुंतवणुकी, वर्क-फ्रॉम-होम ऑफर्स आणि कस्टमर केअर यांचा समावेश आहे. याचदरम्यान सोलापूरमधून सायबर क्राइमसंदर्भात बातमी समोर येते, जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाने आणि छायाचित्राचा वापर करून बनावट सोशल मीडिया खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिएतनाम व थायलंड येथून हे खाते तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या माध्यमातून काही नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांनी स्वतः सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस विभागाच्या सायबर सेलमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Pandharpur: पंढरपुरात भाविकांचा महापूर! व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद, दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल

याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही नागरिकांकडे अशा प्रकारे आर्थिक व्यवहार किंवा पैशांची मागणी केली जात नाही. बनावट खाते व त्यावरील संदेशांमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सदर बनावट खात्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व छायाचित्र वापरून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच एका व्हॉट्सअॅप प्रोफाईलद्वारे नागरिकांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.

संशयास्पद संदेश, कॉल किंवा आर्थिक मागणी आल्यास त्वरित प्रशासन अथवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने नागरिकांना संशयास्पद खाते किंवा संदेश आढळल्यास तात्काळ सायबर सेल किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.

‘डिजिटल अटक’ आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

देशभरात अशी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात फसवणूक करणारे पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लोकांना ‘डिजिटल अटक’ करतात आणि मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. इतकेच नाही, तर सायबर गुन्हेगार ऑनलाइन ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत आहेत.

गोदामांच्या निर्मितीमुळे भिवंडी जलमय होण्याची भीती! तालुका महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता; नागरिकांची अपेक्षा

Web Title: Fake social media account created in collector karthikeyan s name money demand cyber fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • cyber crime
  • maharashtra
  • Social Media

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई
2

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
3

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
4

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.