Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Girl Student Suicide: प्राध्यापकासोबत नाव जोडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये उलगडला धक्कादायक छळ

मृत विद्यार्थिनीचे नाव लिखिता (वय 22) असून ती मल्लाडिहल्ली येथील आयुर्वेद महाविद्यालयात 'बीएएमएस'च्या (BAMS) अंतिम वर्षात शिकत होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिखिताने एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 02, 2026 | 06:39 PM
प्राध्यापकासोबत नाव जोडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये उलगडला धक्कादायक छळ (Photo Credit- X)

प्राध्यापकासोबत नाव जोडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये उलगडला धक्कादायक छळ (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • प्राध्यापकासोबत नाव जोडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
  • सुसाइड नोटमध्ये उलगडला धक्कादायक छळ
  • पोलिसांकडून गुन्हा दाखल
Karnataka Student Suicide News: मैत्रिणींकडून होणारी बदनामी आणि चारित्र्यावर घेतलेल्या संशयामुळे एका 22 वर्षीय आयुर्वेद शाखेच्या विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील होलाल्केरे शहरात ही घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

मृत विद्यार्थिनीचे नाव लिखिता (वय 22) असून ती मल्लाडिहल्ली येथील आयुर्वेद महाविद्यालयात ‘बीएएमएस’च्या (BAMS) अंतिम वर्षात शिकत होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिखिताने एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये तिने आपल्या वर्गमैत्रिणींवर गंभीर आरोप केले आहेत. महाविद्यालयातील एका प्राध्यापकासोबत तिचे नाव जोडून मैत्रिणी तिची सतत बदनामी करत होत्या. या मानसिक त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तिने पत्रात नमूद केले आहे.

पालकांनी दिला होता आधार

लिखिताचे आई-वडील दोघेही शिक्षक असून ते होलाल्केरे येथे राहतात. आपल्या मुलीबद्दल महाविद्यालयात अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी लिखिताची समजूत काढली होती. “अशा फालतू गोष्टींकडे लक्ष न देता तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर,” असा सल्लाही त्यांनी तिला दिला होता. मात्र, मैत्रिणींकडून होणारा सततचा अपमान सहन न झाल्याने लिखिताने घरीच गळफास लावून घेतला.

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त

पोलीस तपास आणि गुन्हा दाखल

या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळजनक उडाली आहे. लिखिताने सुसाईड नोटमध्ये काही मैत्रिणींची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत. या माहितीच्या आधारे होलाल्केरे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी संबंधित मैत्रिणींची आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

सामाजिक प्रश्न: ‘कॅरेक्टर हॅसिनेशन’चा बळी

एका गुणी विद्यार्थिनीने अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. सोशल मीडिया आणि पीअर ग्रुपमध्ये एखाद्याचे चारित्र्यहनन करणे किती जीवघेणे ठरू शकते, याचे हे दाहक उदाहरण आहे. प्रशासनाने आणि महाविद्यालयीन समितीने अशा प्रकरणांमध्ये तत्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दौंडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; पाण्याच्या कनेक्शनवरून पुन्हा वाद झाला अन् नंतर…

Web Title: Female student commits suicide after her name is linked to a professor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Karnataka
  • Student
  • Suicide case

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Cricket News: दावणगिरी एक्सप्रेस सुसाट! कर्णधार म्हणून कमाल, आता कोच म्हणून धमाल; Vinay Kumar कर्नाटकच्या मुख्य प्रशिक्षकपदी
2

Cricket News: दावणगिरी एक्सप्रेस सुसाट! कर्णधार म्हणून कमाल, आता कोच म्हणून धमाल; Vinay Kumar कर्नाटकच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Kangana Ranaut: ‘Gen-Z’ला ‘Generation Gutter’ म्हणणं कंगना रणौतला पडलं महागात; FIR दाखल, कोर्टात सुनावणी होणार
3

Kangana Ranaut: ‘Gen-Z’ला ‘Generation Gutter’ म्हणणं कंगना रणौतला पडलं महागात; FIR दाखल, कोर्टात सुनावणी होणार

कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्…
4

कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.