Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Kalyan Railway Police: धावत्या अमृतसर-मुंबई एक्सप्रेसच्या एसी कोचमधून अवघ्या एका तासात प्रवाशांचे पाच महागडे मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. मुजम्मिल रहमान शेख असे आरोपीचे नाव असून तो मालेगावचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2026 | 05:36 PM
धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Follow Us
Follow Us:
  • धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट!
  • तासाभरात 5 महागडे फोन लंपास
  • आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
Kalyan Railway Police: धावत्या अमृतसर-मुंबई एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अवघ्या एका तासाच्या कालावधीत एसी कोचमधून तब्बल पाच मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. मुजम्मिल रहमान शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एका तासात पाच मोबाईल लंपास

अमृतसर-मुंबई एक्सप्रेसमधून प्रवासी प्रवास करत असताना आरोपीने एसी कोचला लक्ष्य केले. प्रवाशांची नजर चुकवून त्याने एका तासाच्या कालावधीत पाच महागडे मोबाईल चोरल्याचा आरोप आहे. रेल्वेच्या एसी कोचमध्ये चोरी झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही या घटनेनंतर पुन्हा चर्चेत आला आहे.

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

कल्याण स्टेशनवर पोलिसांना आला संशय

कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांना एक प्रवासी संशयास्पद स्थितीत आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली. मात्र चौकशीदरम्यान तो समाधानकारक माहिती न देता उलटसुलट उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला. यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे पाच महागडे मोबाईल फोन आढळून आले. एवढ्या मोठ्या संख्येने मोबाईल आढळल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली.

आरोपीची ओळख पटली

पुढील तपासात संशयिताची ओळख मुजम्मिल रहमान शेख अशी पटली. तो मालेगावचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडून सापडलेल्या मोबाईलची माहिती तपासल्यानंतर ते अमृतसर-मुंबई एक्सप्रेसच्या एसी कोचमधील प्रवाशांचे असल्याचे समोर आले.

आरोपीवर यापूर्वीही 17 गुन्हे

पोलिसांनी आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली. त्याच्याविरोधात यापूर्वी चोरीचे तब्बल 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान आणखी काही चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

कल्याण GRP कडून पुढील तपास सुरू

कल्याण जीआरपी पोलिसांनी मुजम्मिल रहमान शेखला अटक केली असून त्याच्याकडून पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच आरोपीने यापूर्वी रेल्वेमध्ये अशाच प्रकारे आणखी चोऱ्या केल्या आहेत का, याबाबत कल्याण जीआरपी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Web Title: Five mobile phones stolen from ac coach of amritsar mumbai express kalyan grp arrests accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • police

संबंधित बातम्या

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
1

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.