Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वन विभागाची ‘धडाकेबाज’ कारवाई! घोरपडीच्या अवयवांसह तस्कर जेरबंद, शिकाऱ्यांच्या मनात उडाली धडकी

सातारा वन विभागाने वाई-मांढरदेव रस्त्यावर 'पोलीस टाईम स्टाईल' कारवाई करत घोरपडीचे अवयव, हत्ताजोडी आणि वाघाच्या नखांची तस्करी करणाऱ्या सोलापूरच्या दोन तस्करांना वॅगनआर कारसह अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 24, 2026 | 09:08 PM
वन विभागाची ‘धडाकेबाज’ कारवाई! घोरपडीच्या अवयवांसह तस्कर जेरबंद, शिकाऱ्यांच्या मनात उडाली धडकी
Follow Us
Follow Us:

 

  • साताऱ्यात वन विभागाची ‘पोलीस टाईम स्टाईल’ कारवाई
  • वॅगनआरमधून घोरपडीचे अवयव, ‘हत्ताजोडी’ आणि वाघाची नखे जप्त
  • सोलापूरचे दोन तस्कर जेरबंद
पाचगणी : वन्यजीवांची अवैध शिकार, त्यांच्या अवयवांची तस्करी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या काळ्या बाजाराविरोधात सातारा वन विभागाने पुन्हा एकदा ‘पोलीस टाईम स्टाईल’ धडाकेबाज कारवाई करत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. वाई तालुक्यातील कोचळेवाडी परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वन्यजीव तस्कर आणि शिकारींच्या मनात मोठी धडकी भरली असून सातारा वन विभागाच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. २३ मे २०२६ रोजी वन्यप्राणी घोरपडीच्या अवयवांची तस्करी करून अवैध विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा अतिरिक्त कार्यभार वाई (प्रा.) यांना मिळाली होती. माहितीची गंभीरता लक्षात घेत वन विभागाने तत्काळ अॅक्शन मोडमध्ये येत सापळा रचला. वाई वनपरिक्षेत्रातील कर्मचारी आणि फिरते पथक सातारा यांना सोबत घेत संशयित वाहनावर पाळत ठेवण्यात आली.

संध्याकाळी सुमारे ६ वाजून १५ मिनिटांनी वाई-मांढरदेव रस्त्यावरील हॉटेल विक्रांतच्या आवारात संशयित मारुती सुझुकी वॅगनआर क्रमांक MH-14 HW-0506 या वाहनाला अडवण्यात आले. वाहनाची कसून तपासणी केली असता वन विभागालाही धक्का बसेल असा मुद्देमाल समोर आला. वाहनामध्ये घोरपड या संरक्षित वन्यप्राण्याचे मानेपासून तोंडापर्यंतचे अवयव, नर घोरपडीचे चार लिंग म्हणजेच अंधश्रद्धेमध्ये ‘हत्ताजोडी’ म्हणून ओळखले जाणारे अवयव, वाघ किंवा बिबट्यासदृश वन्यप्राण्याचे नख तसेच समुद्री वन्यजीव प्रकारातील ‘इंद्रजाल’ असा मोठा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी महेश सूर्यकांत व्होनफडे (वय २६, रा. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि रोहन गजानन कदम (वय २३, रा. तांबवे भवानीनगर, पो. माळीनगर अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. आरोपींकडून रोख १५ हजार रुपये, दोन मोबाईल तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

Thane Crime : ठाणे पोलीसांना मोठं यश; बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

दोन्ही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम २, ९, ३९, ४४, ४८(अ), ४९(ब), ५० आणि ५१ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना दि. २४ मे रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी वाई करीत आहेत.

विशेष म्हणजे ही कारवाई अत्यंत शिताफीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली. उपवनसंरक्षक सातारा अमोल सातपुते (भा.व.से.), विभागीय वनाधिकारी (दक्षता) कोल्हापूर संजय वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा प्रदीप रौंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) वाई गणेश महांगडे, वनपाल वाई संग्राम मोरे, वनपाल फिरते पथक धोंडीबा बोडके तसेच वाई वनपरिक्षेत्र आणि फिरत्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनीही या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.

वन विभागाच्या या ‘डॅशिंग’ कारवाईमुळे वन्यजीवांची शिकार करून अंधश्रद्धा, जादूटोणा आणि काळ्या बाजारासाठी अवयव विकणाऱ्या टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यजीवांची शिकार करणे, त्यांच्या अवयवांची विक्री किंवा खरेदी करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा असून अशा आरोपींना ३ ते ७ वर्षांपर्यंत कारावास आणि मोठ्या दंडाची तरतूद असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

“अंधश्रद्धेपोटी किंवा पैशांच्या हव्यासापोटी वन्यजीवांचा बळी घेऊ नका. अशा प्रकारच्या घटना कुठेही आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी,” असे आवाहन सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे. सातारा वन विभागाने केलेल्या या थरारक कारवाईमुळे आता वन्यजीव तस्करांचे धाबे दणाणले असून “वन्यजीवांवर डोळा ठेवणाऱ्यांना आता गय नाही,” असा स्पष्ट संदेशच या कारवाईतून देण्यात आला आहे.

Pune Crime : चारित्र्याचा संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; डोक्यात सिलेंडर घातला अन्…

Web Title: Forest departments daring operation smugglers apprehended with monitor lizard organs poachers struck with fear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Forest Department
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
1

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
2

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
3

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर
4

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.