Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Satara Bhairavnath Temple Concrete Work Controversy,: साताऱ्यातील गडकर आळीतील श्री पेढ्याचा भैरवनाथ मंदिर परिसरातील काँक्रीटीकरणाच्या कामावरून वाद निर्माण झाला असून, नैसर्गिक पाऊलवाटा व हिरवाई नष्ट केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 05, 2026 | 09:23 PM
Satara Bhairavnath Temple Concrete Work Controversy

Satara Bhairavnath Temple Concrete Work Controversy

Follow Us
Follow Us:
  • श्रद्धास्थान की काँक्रीटचे जंगल?
  • भैरवनाथ मंदिर परिसराच्या विकासावर ग्रामस्थ नाराज
  • दोषींवर कारवाई करण्याची ठाकरेगटाची मागणी
सातारा : गडकर आळीतील ग्रामदैवत श्री. पेढ्याचा भैरवनाथ मंदिर परिसराच्या विकासकामावरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. नैसर्गिक पाऊलवाटा, माती आणि हिरवाईचा परिसर काँक्रीटच्या विळख्यात का आणला, असा थेट सवाल उपस्थित करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन दिले. मंदिर परिसराची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून काँक्रीटीकरणाच्या कामाची तांत्रिक व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.

Satara News:  :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

शहरप्रमुख प्रणव सावंत यांच्या पुढाकाराने गडकर आळीतील ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी नगराध्यक्षांची भेट घेतली. काँक्रीटीकरणापूर्वी आणि नंतरची छायाचित्रे दाखवून मंदिर परिसराचे मूळ नैसर्गिक स्वरूप बदलल्याचा दावा करण्यात आला. नैसर्गिक पाऊलवाटा असताना काँक्रीटचा घाट घालण्याची गरज नेमकी काय होती? या कामाचा आराखडा कोणी तयार केला, कोणत्या तांत्रिक निकषांवर मंजुरी देण्यात आली आणि कोणत्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली.

सार्वजनिक निधीतून होणारे काम केवळ दिसायला आकर्षक नव्हे, तर दर्जेदार आणि दीर्घकालीन असणे आवश्यक आहे. त्यामुळे अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी, वापरलेले साहित्य, कामाची गुणवत्ता आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. अनियमितता किंवा निकृष्ट काम आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

मंदिर परिसरातील वृक्षारोपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. किती झाडे लावली, किती जगली आणि संगोपनासाठी किती खर्च झाला, याचा हिशेब सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान, मंदिराचे पावित्र्य, भाविकांची सुरक्षितता आणि परिसरातील शिस्त अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. “विकासाच्या नावाखाली श्रद्धास्थानाचे नैसर्गिक अस्तित्वच संपवू नये,” अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

उजनीवरील खाजगी मासेमारी ठेका रद्द; मच्छीमारांना मोठा दिलासा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Web Title: Satara bhairavnath temple concrete work controversy shiv sena ubt contractor action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Satara Municipal Council
  • Satara News
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
1

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर
2

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत
3

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
4

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.