Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली सोशल मीडियावर देणगीचे आवाहन करून निधी संकलित केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. SIOच्या नावाचा वापर करून जमा करण्यात आलेला निधी संस्थेच्या अधिकृत खात्याऐवजी वैयक्तिक बँक खात्यांमध्ये स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2026 | 06:57 PM
‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा?
  • दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
  • संस्थेच्या खात्याऐवजी वैयक्तिक खात्यांवर निधी जमा केल्याचा आरोप
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन (एसआयओ) धाराशिव या संस्थेच्या नावाचा वापर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जकात’ व देणगी देण्याचे आवाहन करत नागरिकांकडून निधी उकळल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्लम चांदपाशा शेख (रा. खाजा नगर, धाराशिव) आणि एसआयओ धाराशिवचे सदस्य निहाल सिकंदर शेख (रा. सुलतानपुरा, येडशी रोड, धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Amravati Crime News: ब्रेकअपचा राग अन् भरदिवसा चाकू हल्ला! अमरावतीतील रवी नगर चौकात तरुणी जखमी; आरोपीचा शोध सुरू

याबाबत दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर युनिटच्या धाराशिव कॅम्पमधील फयाजोद्दीन गयासोद्दीन काझी (वय ४९) यांनी २ सप्टेंबर रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार, ८ मार्च २०२५ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून एसआयओ धाराशिवच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर केल्याचा आरोप आहे. संस्थेच्या नावाने ‘जकात’ व देणगी देण्याचे आवाहन करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, संस्थेच्या अधिकृत बँक खात्यावर देणगी स्वीकारण्याऐवजी आरोपींनी स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांवर पैसे जमा करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यासाठी विविध मोबाईल क्रमांक, यूपीआय आयडी तसेच क्यूआर कोडचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर प्रसारित करून त्याद्वारे निधी जमा करण्यात आल्याचेही पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

‘जकात’ म्हणजे इस्लाम धर्मातील पाच मुख्य कर्तव्यांपैकी (स्तंभांपैकी) एक, ज्याचा मुख्य उद्देश श्रीमंतांच्या संपत्तीचा काही भाग गरजू आणि गरिबांना देणगी म्हणून देणे हा आहे. ‘जकात’ या अरबी शब्दाचा अर्थ ‘शुद्ध करणे’ असा होतो. आपल्या हक्काच्या कमाईतून ठराविक हिस्सा गरिबांना दिल्यास उरलेली संपत्ती पवित्र होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Pune Crime News: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर

Web Title: Fraud case over zakat donations sio name social media personal bank accounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Social Media

संबंधित बातम्या

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
1

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप
2

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
4

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.