डोंबिववलीमध्ये चक्क मित्रच मित्राचा वैरी झाल्याची घटना समोर आली आहे. मित्राच्या पैश्यांवर डोळा ठेवणाऱ्या या आरोपींनी आपल्याच मित्राच्या मुलाला किडनॅप करण्याचा कट रचला. रात्रभर वाढदिवसाची पार्टी झाली आणि मित्राच्या मुलाचे अपहरण करुन दोन कोटीची खंडणी मागण्याचे ठरले. मुलाचे दुसऱ्या दिवशी मुलाचे अपहरण ही केले. मात्र सूत्रधार रिक्षा चालकाच्या भावाच्या एका खुलाश्याने या घटनेचे बिंग फुटले. मानपाडा पाेलिसांनी सहा वर्षाच्या कैवल्य भोईरची सुटका करीत या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन आरोपीना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. आणखीन एक आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
डोंबिवलीतील पिसवली राहणारे महेश भोईर यांनी नुकतीच एक शेतजमीन विकली आहे. त्या शेत जमीनीच्या विक्रीतून त्यांना पाच काेटी मिळाले असल्याची माहिती त्यांच्या काही मित्रांना होती. त्यांच्या सहा वर्षीय मुलाला शाळेत सोडणारा रिक्षा चालक विरेन पाटील याने एक कट रचला. काही साथीदारांना सोबत घेऊन महेश भोईर यांच्या मुलाचे अपहरण करण्याचे ठरविले. २७ मार्चच्या रात्री विजय देवडेकर याच्या घरी वाढदिवसाची पार्टी झाली. रात्रभर दारु पिऊन धिंगाणा केला. त्याच वेळी महेश भोईर यांच्या मुलाचे सकाळी अपहरण कसे करायचे याची योजना आखली गेली. सकाळी ठरल्यानुसार सहा वर्षाच्या कैवल्य याला घेऊन रिक्षा चालक विरेन पाटील हा शाळेसाठी निघाला. रिक्षात संकेत मढवी देखील बसला होता. काही लोक आले. मुलाच्या तोंडावर कपडा घातला. रिक्षा चालक आणि मुलाला घेऊन घेऊन गेले.
मात्र जेव्हा मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने आणि पोलिस निरिक्षक राम चोपडे, पोलिस निरिक्षक दत्तात्रय गुंड आणि पाेलिस अधिकारी संपत फडोल, महेश राळेभात, अभिजीत पाटील आणि कोलगंडा पाटील यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरु झाला. सर्वात आधी रिक्षा चालक विरेन पाटील याच्या भावाला ताब्यात घेतल्यावर सकाळी मुलाला सोडण्या दरम्यान संकेत मढवी रिक्षात बसला होता. तो एका ठिकाणी उतरला. पोलिसांनी संकेतला ताब्यात घेतला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सर्व हकीगत पोलिसांना सांगितली. आधी संकेत आणि विरेनला अटक केली होती. त्यांच्या सोबत दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले होेते. शनिवारी या प्रकरणातील आरोपी विजय देवडेकर आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन आरोपींना चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. खंडणीचे दोन काेटी मिळाल्यावर चांगले पैसे भेटतील या उद्देशाने अपहरणाचा डाव आखला गोला होता. आत्ता यासर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी संपत फडोल हे करीत आहेत.