१० जूनला माओवाद्यांकडून देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजू चकमकीत हा मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी हे बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी देशभर ‘स्मारक सभा’ आयोजित करण्याचे ही माओवाद्यांचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.
कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती; राज्य शासनाला ‘इतक्या’ कोटींचा आर्थिक लाभ
नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगना उर्फ बसवराजू हा काही दिवसांपूर्वी छत्तीसगड- महाराष्ट्र सीमेवर झालेल्या चकमकीत मारला गेला. नंबाला केशव राव उर्फ बसव राजू या माओवाद्यांच्या जनरल सेक्रेटरीच्या एन्काऊंटरनंतर माओवादी चांगलेच संतापले आहे. केंद्र सरकारने माओवाद्यांच्या शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत २१ मे रोजी २७ माओवाद्यांची हत्या केल्याचा आरोप माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने काढलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. हे पत्रक माओवाद्यांची केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभयने काढला आहे. जानेवारी 2024 पासून केंद्र सरकारने अशाच पद्धतीने 540 माओवाद्यांना मारल्याचे आरोपही या पत्रकातून करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या याच धोरणाचा विरोध करण्यासाठीच 10 जूनला देशव्यापी बंदचे आवाहन माओवाद्यांनी केले आहे. आणि ११ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान काम्रेड बसव राजू आणि इतर मारलेल्या माओवाद्यांच्या स्मृतीत ‘स्मारक सभा’ आयोजित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे..
माओवाद्यांची आगपाखड- संदीप पाटील
दरम्यान, आत्मसमर्पन धोरण व त्यातून निर्माण होणार संधी हा माओवाद्यांना संघर्षविरामाचा एक मार्ग आहे. त्यामुळे पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव एका क्षणात मान्य केला व दोन महिन्यापासून आम्ही देत असलेल्या युद्ध बंदीच्या प्रस्तावाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे, हा माओवाद्यांचा दावा महाराष्ट्र नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी फेटाळून लावला आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसव राजू मारला गेल्यानंतर माओवाद्यांची आगपाखड झाली असल्याने माओवादी असे दावे करत आहे. माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा प्रवक्ता विकल्प ने माओवाद्यांचा सर्वोच नेता बसव राजुच्या मृत्यूच्या नंतर नुकतेच माओवाद्यांनी एक पत्रक कडून हे दावे केले होते. जंगलात माओवाद्यांची उडालेली दाणादाण व होत असलेली पीछेहाट बघता माओवाद्यांचा हा संघर्ष जंगलातून शहराकडे येणाची शक्यता देखील नाकारत येणार नाही. मात्र आम्ही तितकेच सतर्क सल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.
मोठी बातमी! तलावात पोहायला गेले अन् दमछाक झाली; ४ शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू