• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Four School Children Drowned In A Lake Chakan Marathi News

मोठी बातमी! तलावात पोहायला गेले अन् दमछाक झाली; ४ शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2025 | 07:48 AM
मोठी बातमी! तलावात पोहायला गेले अन् दमछाक झाली; ४ शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

चाकणमध्ये ४ मुलांचा बुडून मृत्यू (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चाकण:  चाकण जवळच्या कडाची वाडी (ता. खेड) येथील पी. के. टेक्निकल कॉलेज जवळ असणाऱ्या पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा दमछाक झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि. ३१) दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकला.

ओमकार बाबासाहेब हंगे (वय 13 वर्षे, राहणार मार्तंड नगर मेदनकरवाडी, मूळ राहणार हंगेवाडी, तालुका केज, जिल्हा बीड), श्लोक जगदीश मानकर (वय 13 वर्षे, राहणार मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ राहणार धनवडी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय 13 वर्षे राहणार मेदनकरवाडी ता. खेड मूळ राहणार अंबुलगा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड), नैतिक गोपाल मोरे (वय 13 वर्षे, रां. मेदनकरवाडी ता. खेड, मूळ राहणार बुलढाणा झरी बाजार, तालुका अकोट, जिल्हा अकोला.) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.

या बाबतची सविस्तर माहिती अशी की, हे चौघेही सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपापल्या घरातून या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. दुपार पर्यंत मुले घरी न आल्याने मुलांच्या पालकांनी आजूबाजूला शोध घेतला असता पाझर तलावाच्या काठावर सदर मुलांच्या चपला आणि कपडे पडल्याचे आढळून आल्याने मुलं पाण्यात बुडाली की काय याचा शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. काही वेळातच या चारही मुलांचे मृतदेह सापडले. आपल्या चिमुकल्यांचा मृतदेह पाहताच पालकांनी एकच हंबरडा फोडला.

उदरनिर्वाहसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी या मुलांचे आई वडील राज्याच्या इतर जिल्ह्यांतून चाकण या ठिकाणी आले होते. भाड्याने खोल्या घेऊन राहणाऱ्या चारही कुटुंबातील मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मेदनकरवाडीचे माजी सरपंच महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर आदींनी चाकण ग्रामीण रुग्णालयात भेटी देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

सायनी येथील पिल्लई महाविद्यालयात थर्ड इअरमध्ये शिकणारा अनिकेत किसन भगत (वय 20) याचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत हा सुकापूर, पनवेल येथील विद्यार्थी असून, परीक्षा संपल्यावर आणि  सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला.

मोरबे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; दमछाक झाली अन्…

सर्व मित्र पाण्याबाहेर असताना पोहोण्यासाठी तो पाण्यात उतरला. काही अंतर गेल्यावर त्याची दमछाक झाली आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी ही माहिती स्थानिकांना दिल्यावर खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार हे पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह दाखल झाले. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करणारी सामाजिक संस्था प्रमुख गुरुनाथ साठेलकर आपल्या टीमसह दाखल झाले. दीड तास पोहून आणि बोटीने पाण्यात तपास केल्यावर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मृतदेह सापडला.

Web Title: Four school children drowned in a lake chakan marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 07:46 AM

Topics:  

  • Accident
  • Chakan News
  • Drowned

संबंधित बातम्या

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO
1

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO

Accident: कोपरगावजवळ भीषण अपघात! बस-कार धडकेत कारचालकाचा होरपळून मृत्यू; अनेक प्रवासी जखमी
2

Accident: कोपरगावजवळ भीषण अपघात! बस-कार धडकेत कारचालकाचा होरपळून मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…
3

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Nov 18, 2025 | 07:55 PM
जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”

Nov 18, 2025 | 07:48 PM
‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू

Nov 18, 2025 | 07:47 PM
Hindu Religion: 93 वा 95 नाही, तर हिंदू धर्मात चितेच्या राखेवर 94 आकडाच का लिहिला जातो? काय आहे रहस्य

Hindu Religion: 93 वा 95 नाही, तर हिंदू धर्मात चितेच्या राखेवर 94 आकडाच का लिहिला जातो? काय आहे रहस्य

Nov 18, 2025 | 07:47 PM
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य! प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, शिकून घ्या ‘चित्रपट निर्मिती करणे’

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य! प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, शिकून घ्या ‘चित्रपट निर्मिती करणे’

Nov 18, 2025 | 07:38 PM
Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Nov 18, 2025 | 07:30 PM
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ जाहीर!

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ जाहीर!

Nov 18, 2025 | 07:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.