झोपेच्या गोळ्यांनी हत्या
१० मृत, २७वर प्रयत्न
नर्सला जन्मठेप शि
जर्मनी हादरवणारी ही घटना मानवी संवेदनांचा काळा चेहरा दाखवणारी आहे. डॉक्टर, नर्स किंवा रुग्णसेवक हे आपल्या समाजातील देवदूत मानले जातात. त्यांच्याकडून अपेक्षा असते की ते जीव वाचवतील, पण जर्मनीमध्ये एका नर्सने याच्या अगदी उलट कृत्य करून सर्वांना हादरवून सोडलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पश्चिम जर्मनीतील वुअरसेलन (Wuerselen) या शहरात ही भीषण घटना घडली. इथल्या एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सने डिसेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत १० रुग्णांची हत्या केली आणि २७ जणांना मारण्याचा प्रयत्न केला. तपासात समोर आलं की, ती रात्रीच्या पाळीत रुग्णांची सेवा करत असताना त्यांना मॉर्फिन आणि मिडानोजोलान या शक्तिशाली औषधांचे अत्याधिक डोस द्यायची. या औषधांमुळे झोप येते आणि वेदना कमी होतात, परंतु जास्त मात्रेत ते जीवघेणे ठरतात.
सरकारी वकिलांनी सांगितले की, नर्सला रुग्णांच्या मागण्या आणि सततचा संपर्क यामुळे चीड येत होती. रुग्णांना वारंवार लक्ष हवे असायचे आणि ती त्रासून जायची. अखेर तिने त्यांच्या त्रासाचा ‘शेवट’ करण्याचा निर्णय घेतला. ती त्यांना जास्त प्रमाणात औषधं देऊन त्यांच्या शरीरात अशी प्रतिक्रिया निर्माण करत होती की त्यांचा मृत्यू होत असे.
न्यायालयात चालला खटला
न्यायालयात या प्रकरणावर खटला चालला आणि पुरावे अत्यंत ठोस असल्याने नर्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने या प्रकरणात निरीक्षण नोंदवत म्हटलं की, ही नर्स ज्या जबाबदारीसाठी नेमली गेली, तीच जबाबदारी तिने अत्यंत निर्दयीपणे मोडली. ही केवळ हत्या नाही, तर मानवतेवरचा प्रहार आहे.
तपास सुरु
या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. पोलिस आणि वैद्यकीय तपास पथक सध्या हे शोधत आहेत की आणखी काही रुग्ण तिच्या या कृत्याचा बळी ठरले आहेत का. अधिक पुरावे मिळाल्यास तिच्यावर आणखी खटले चालवले जाऊ शकतात. ही घटना केवळ जर्मनीपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण जगासाठी एक गंभीर इशारा आहे. सेवा देण्याच्या शपथेच्या मागे जर मानवता हरवली, तर देवासमान समजली जाणारी ही व्यावसायिक क्षेत्रेही भयावह ठरू शकतात.
Ans: जर्मनी
Ans: नर्स
Ans: जन्मठेप






