नवी मुंबई: नवी मुंबईच्या खारघर येथून खंडणीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलकात्याच्या एका महिलेने तब्बल ₹२४ लाख १७ हजार २८ रुपये इतकी खंडणी उकळल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना खारघर तसेच कोलकत्ता येथील वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीसोबत घडली आहे.पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे.
कसे उकळले पैसे?
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ती कलकत्ता व खारघर येथे असतांना सुष्मिता सुकुमार देबनाथ (रा. ५८, बोसपुकुर, पुरबपारा, कसबा, कोलकत्ता, पश्चिम बंगाल – ७०००४२) या महिलेने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले फिर्यादीचे नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवून, ते त्याच्या पत्नी, नातेवाईक, मित्र आणि ग्राहकांना पाठवण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर, तिने अश्लील भाषेत शिवीगाळ करून, फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना “शरीराचे १००० तुकडे करून मारून टाकण्याची” अशी थरकाप उडवणारी धमकी दिली.
या सातच्या धमक्यांमुळे फिर्यादीकडून सुष्मिता हिने रोक आणि ऑनलाईन स्वरूपात १८,१५,१३४ रुपये, तसेच ६,०१,८९४ रुपयांच्या महागड्या वस्तू अशा मिळून एकूण २४,१७,०२८ रुपये उकळले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या फिर्यादीने सुष्मिता सुकुमार देबनाथ हिच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. आरोपी महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर विश्वास संपादन करून आर्थिक उकळपट्टी केली.
नवी मुंबई पोलिसांचा आवाहन
या प्रकरणाचा अधिक तपास नवीमुंबई पोलिसांकडून सुरु आहे. प्राथमिक चौकशीत हे प्रकरण सायबर ब्लॅकमेलिंग आणि खंडणी खोरीशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या धमक्या किंवा ब्लॅकमेलिंगच्या घटनेत तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, आणि कोणत्याही परिस्थितीत अशा व्यक्तींना पैसे पाठवू नयेत.
Ans: खारघर
Ans: कोलकाता
Ans: खंडणी






