काही दिवसापुर्वी केरला स्टोरी सिनेमावरुन देशभरात लव्ह जिहाद ( Love Jihad)हा प्रकार मोठ्या प्रमाणावर चर्चिल्या जात आहे. यावरुन अनेक मते मतांतरे असताना आत अशा प्रकारची घटना उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मध्ये एका मुस्लीम तरुणाने फेसबुकवर नाव बदलून एका मुलीशी मैत्री करून नंतर तिच्यावर अत्याचार केला एवढेच नाही तर आरोपीने तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्तीही केली. तसेच तिला गोमांसही खायला दिले. मुलीच्या तक्रारी नंतर हे प्रकरण उजेडात आलं असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गाझियाबादमधील विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिर्झापूर येथील रहिवासी आहे.या तरुणीने आरोप केला आहे की, खालिद नावाच्या मुस्लिम तरुणाने आधी तिच्याशी दीपक नाव सांगत सोशल मीडियावर मैत्री केली आणि नंतर मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर, तिला कळले की त्याचे नाव दीपक नसून त्याचे खरे नाव खालिद चौधरी आहे. पिडित मुलीने पोलिसांना सांगितले की, त्याचं खरं रुप कळल्यावर तिने त्या मुलापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, परंतु खालिद चौधरीने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवत असे. ती गर्भवती असतानाही त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यामुळे मुलीचा गर्भपात झाला.
मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपी खालिद मला इस्लाम स्वीकारण्यास सांगू लागला. तो मला निजामुद्दीन मशिदीत घेऊन जायचा. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने माझ्या कंबरेवर खालिदच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला. त्यांनी मला हिजाब घालायला लावले आणि निकाहच्या नावावर गोमांसासह अनेक प्राण्यांचे मांस खायला दिले आणि माझे धर्मांतर करून माझे नाव बदलले. मी नाव बदलण्यास विरोध केला असता आरोपीने सांगितले की, हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करण्याचे आदेश वरून दिले जातात.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विजयनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी आरोपी खालिद चौधरीविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३१३, ३२३, ५०६, एससी-एसटी कायदा आणि धर्मांतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.