पुण्यात एक धकादाय्यक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पिंपळे सौदागर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मटणाच्या सूपमध्ये भाताचे कण आल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींना राग आला आणि त्यांनी हॅाटेल कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि त्याची हत्या करण्यात आली. मंगेश पोस्टे या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. हे दोघे फरार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे : जेवताना मटणाच्या सुपात भाताचे कण, बेदम मारहाणीत वेटरचा मृत्यू pic.twitter.com/1pJ1WNh5x1
— Maharashtra Times (@mataonline) November 17, 2022