Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JNPT बंदरात बेकायदा सिगारेट तस्करी, कोट्यावधींचा साठा जप्त

उरण तालुक्यातील JNPT बंदरातून देशात बेकायदेशीर सिगारेटची तस्करी करणाऱ्या टोळीवर महसूल विभागाने कारवाई करत कोट्यावधींचा साठा जप्त केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 19, 2025 | 07:03 PM
JNPT बंदरात बेकायदा सिगारेट तस्करी, कोट्यावधींचा साठा जप्त
Follow Us
Follow Us:

उरण तालुक्यातील JNPT बंदरातून देशात बेकायदेशीर सिगारेटचा मारा करणाऱ्यांच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल 13.18 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेटचा साठा डीआरआयने उधळून लावत, एकाला अटक केली आहे. भारतात विक्रीस बंदी असलेली ही सिगारेट समुद्रमार्गे चोरट्या पद्धतीने देशात आणली जात होती. कस्टम ड्युटीला डोक्यावर घेऊन देशाच्या आरोग्यावर घाला घालणाऱ्या टोळीच्या डावावर डीआरआयने थेट घाव घातला आहे.

DRI मुंबई युनिटला मिळालेल्या खाजगी माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. न्हावा-शेवा बंदरात आलेल्या एका कंटेनरमध्ये ‘कोटेड कॅल्शियम कार्बोनेट’ असे खोटे भासवून चक्क 1014 कार्टून परदेशी सिगारेट देशात घुसवण्याचा डाव होता. परंतु, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हा खेळ पुरता हाणून पाडत, कंटेनरमधून 1 कोटी 1 लाख 40 हजार सिगारेट जप्त केल्या. यावर कुठलाही वैधानिक इशारा नसल्याने या सिगारेट पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात.

सध्या या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कस्टम कायदा 1962 आणि सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम 2008 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, याप्रकरणाचा तपास अधिक सुरू आहे.देशातल्या तरुण पिढीच्या आरोग्यावर झडप घालणाऱ्या या सिगारेट सिंडिकेटमागे आणखी कोण आहेत, हे उघडकीस आणण्यासाठी तपास यंत्रणांची खरी कसोटी आता सुरू झाली आहे.

डीआरआयनं न्हावा शेवा बंदरात छापेमारी करत तब्बल 13.18 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला. या प्रकरणात डीआरआयकडून एका आरोपीला अटकही करण्यात आली. डीआरआयनं जप्त केलेल्या सिगारेटला भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही छुप्या पद्धतीनं समुद्रमार्गे कस्टम ड्युटी चुकवून या बंदी घातलेल्या सिगरेटची तस्करी करण्यात येत होती. महसूल गुप्तचर संचालन (DRI), मुंबई विभागीय युनिटला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली. भारतात छुप्या पद्धतील कस्टम ड्युटी चुकवून समुद्रमार्गे तस्करी सुरू असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. भारतात विदेशी सिगारेटची तस्करी होणार आहे, अशी माहिती मिळताच डीआरआयनं महागड्या विदेशी सिगरेटच्या तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली.

 

Web Title: Illegal cigarette smuggling at jnpt port stock worth crores seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • latest news
  • Marathi News
  • Raigad News
  • Uran

संबंधित बातम्या

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
1

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी
2

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
3

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
4

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.