Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड हादरले! २२ वर्षीय तरुणीने गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या अन्…

संबंधित तरुणी सात महिन्यांची गरोदर होती. मात्र, याबद्दल तिने आपल्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. मंगळवारी सकाळी तिने स्वतःहून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 28, 2026 | 09:24 AM
Premature Delivery, PCMC News, Women And Baby,

Premature Delivery, PCMC News, Women And Baby,

Follow Us
Close
Follow Us:

PCMC News: पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्याने एका २२ वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या महिन्यांच्या नवजात अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, असुरक्षित गर्भपाताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला? अर्थसंकल्पीय महासभेत

 

कुटुंबीयांपासून लपवले होते मातृत्व

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सात महिन्यांची गरोदर होती. मात्र, याबद्दल तिने आपल्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. मंगळवारी सकाळी तिने स्वतःहून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. या गोळ्यांच्या परिणामामुळे तिची मुदतपूर्व प्रसूती (Premature Delivery) झाली. प्रसूतीनंतर तरुणीला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली. तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दुसरीकडे, सात महिन्यांच्या नवजात बाळाला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही काही तासांतच दोघांचाही मृत्यू झाला.

 

पोलीस तपासात अनेक प्रश्न

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या कोणी पुरवल्या, त्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कशा मिळाल्या आणि हे प्रकरण दडपण्यासाठी हे सर्व करण्यात आले का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. अविवाहित तरूणीने उचललेल्या या टोकाच्या निर्णयामुळे तिच्या कुटुंबावर मोठा आघाच झाला आहे. पण अनधिकृतपणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली जावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

देशातील 70% महिलांना PCOS-PCOD, वाढतोय वंध्यत्वाचा धोका; Swami Ramdev नी सांगितला रामबा

दुसरीकडे या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत. पोलिसांनी तरुणीचा मोबाईल फोन मिळाला तेव्हा तो फोन फॉरमॅट केलेला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय अजूनच बळावला आहे. तसेच, तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या कोणी पुरवल्या आणि तिचा मोबाईल फॉरमॅट करून त्यातील डेटा नष्ट कोणी केला, यामागे हे प्रकरण दडपण्याचा तर हेतू नव्हता ना, असा प्रश्न आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आता चिंचवड पोलिसांनी तपासचक्र फिरवले आहे. मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

 

Web Title: In pimpri chinchwad a 22 year old woman and her seven month old fetus died after she took abortion pills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • health issue
  • PCMC News
  • women health

संबंधित बातम्या

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या
1

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या

Women Health News : महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव; PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार
2

Women Health News : महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव; PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
3

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण
4

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.