Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुन्हेगारांना खुली सूट! पिंपरी-चिंचवड शहरात अनेक CCTV कॅमेरे फक्त टांगलेलेच

बंद कॅमेर्‍यांमुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येत असून, नागरिकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2025 | 12:32 AM
गुन्हेगारांना खुली सूट! पिंपरी-चिंचवड शहरात अनेक CCTV कॅमेरे फक्त टांगलेलेच
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी आणि वाहतुकीसंदर्भातील प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. बंद कॅमेर्‍यांमुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येत असून, नागरिकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हाणामार्‍या, लुटमार, आंदोलने किंवा इतर गुन्ह्यांचे दृश्य पुरावे सीसीटीव्हीमुळे मिळतात. बंद कॅमेर्‍यांमुळे अशा घटनांमध्ये पोलिसांना न्यायालयात पुरावे सादर करताना अडचणी येत आहेत. वाहतूक अपघातांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाची भूमिका बजावते. अपघाताची कारणे, दोषी वाहने किंवा नियम तोडणार्‍या चालकांची माहिती मिळवण्यासाठी कॅमेरे उपयुक्त ठरतात. मात्र, सध्या अनेक कॅमेरे बंद असल्याने वाहतूक पोलिसांनाही तपास प्रक्रिया प्रभावीपणे करता येत नाही. शहरातील बंद कॅमेर्‍यांच्या समस्येचे मूळ कारण म्हणजे प्रशासनाचे दुर्लक्ष. कॅमेर्‍यांची वेळोवेळी देखभाल, दुरुस्ती आणि गुणवत्तेची तपासणी करण्यात येत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कॅमेरे चुकीच्या ठिकाणी बसवले गेले असून, ते महत्त्वाचे भाग कव्हर करत नाहीत.

वेळेवर देखभाल दुरुस्ती नसल्याने कॅमेरे अकार्यक्षम

महापालिका आणि स्मार्ट सिटीअंतर्गत शहरभरात कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तब्बल पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, वेळेवर देखभाल आणि दुरुस्ती न झाल्याने कॅमेरे बंद किंवा अकार्यक्षम असल्याची ओरड होत आहे. याव्यतिरिक्त खासगी कॅमेर्यांची प्रतिमा गुणवत्ता (क्वॉलिटी) खालावल्यामुळे त्यातून मिळणारे फुटेज धूसर आहे. तसेच, काही कॅमेरे चुकीच्या दिशेला बसवले गेल्याने त्याचा पोलिस तपासात काहीही उपयोग होत नाही. पोलिस तपासामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग गुन्हेगार ओळखणे, त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि पुरावे गोळा करणे यासाठी होतो. मात्र, शहरातील कॅमेरे बंद असल्याने गुन्हेगारांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. चोरी, खून किंवा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगार कोणत्या दिशेने गेले, त्यांनी कोणत्या वाहनाचा वापर केला, हे समजण्यास मदत होते. बंद कॅमेर्‍यांमुळे पोलिसांना हे महत्त्वाचे पुरावे मिळत नाहीत, ज्यामुळे तपास प्रक्रियेत उशीर होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बंद कॅमेर्‍यांमुळे तपास ठप्प

शहरातील सोन साखळी चोरीसारख्या घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हेगारांचा माग काढणे शक्य होते. एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणावरून निघाल्यानंतर गुन्हेगार कोणत्या मार्गाने गेले, त्यांचे वाहन कोणते होते, हे कॅमेर्‍यांमुळे स्पष्ट होते. बंद कॅमेर्‍यांमुळे अशा प्रकारचा तपास ठप्प होत आहे.

या उपाययोजनांची गरज

  • लोकसहभागातून महत्त्वाच्या ठिकाणी उच्च-गुणवत्तेचे, रात्री चांगली प्रतिमा देणारे कॅमेरे बसवावेत.
  • योग्य ठिकाणी कॅमेरे बसवणे
  • व्यापार्‍यांना विश्वासात घेऊन दुकानाबाहेर कॅमेरे बसवून घेणे
  • पोलिस विभागाच्या सल्ल्यानुसार कॅमेर्‍यांची पुन्हा स्थान निश्चिती करणे आवश्यक आहे.
  • तातडीने देखभाल आणि दुरुस्तीचा कार्यक्रम राबवणे
  • महापालिकेने सर्व बंद कॅमेर्‍यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी.

Web Title: In pimpri chinchwad city due to closed cctv the police are facing obstacles in the investigation nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 12:32 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pimpri News

संबंधित बातम्या

अन्वेषणाचा नवा युग! महाराष्ट्र साहसी पर्यटन आराखड्याचे विश्लेषण; बंजी जंपिंगसारख्या खेळांना मोठी मागणी
1

अन्वेषणाचा नवा युग! महाराष्ट्र साहसी पर्यटन आराखड्याचे विश्लेषण; बंजी जंपिंगसारख्या खेळांना मोठी मागणी

Crime News: चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत खून प्रकरणाचा छडा; दोन आरोपी जेरबंद
2

Crime News: चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत खून प्रकरणाचा छडा; दोन आरोपी जेरबंद

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत
3

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत

Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर…; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
4

Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर…; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.