Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरांना राहिला नाही धाक! घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली अन्…

वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम अज्ञातांनी लंपास केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 03, 2025 | 12:35 AM
चोरांना राहिला नाही धाक! घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली अन्...

चोरांना राहिला नाही धाक! घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली अन्...

Follow Us
Follow Us:

नारायणगाव : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळा येथील वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम अज्ञातांनी लंपास केली आहे. ही घटना सोमवार (३० डिसेंबर) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी वृद्ध दाम्पत्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कानातील दागिने चोरट्यांनी ओरबडून नेले आहेत. डोक्याला जबर मारहाण लागल्याने त्यांना डोक्याला बारा व कानाला बारा टाके पडले आहेत. जिजाबाई तुकाराम आतकरी (वय ६५) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळ्यात तुकाराम गणपत आतकरी (वय ७२) व त्यांची पत्नी जिजाबाई तुकाराम आतकरी (वय ६५) हे दोघेच बंगल्यात राहतात. अज्ञाताने त्यांच्यावर पाळत ठेवून सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. लाकडी दांडक्याने दोघांना जबर मारहाण केली. दरम्यान महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. तसेच कानातील दागिने निघत नसल्यामुळे अक्षरश: ते ओरबडून काढल्याने दोन्ही कानांना जखम झाली आहे. वृद्धेच्या हातातील सोन्याची अंगठी तसेच लॉकरमधील दागिने, रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी एक लाख वीस हजार रुपये रोख व १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला.

हे सुद्धा वाचा : रोजगारासाठी चौघं पुण्यात आले अन् रिक्षाचालकांनी ‘झटका’च दिला; काय आहे प्रकरण? वाचाच

जबर मारहाण केल्याने दोघेही पडले बेशुद्ध

दरम्यान वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण केल्याने काही काळ ते दोघेही बेशुद्ध पडले होते. काही वेळाने तुकाराम आतकरी शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर शेजारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची माहिती नारायणगाव पोलिसात दिल्याने काही वेळातच नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून श्वान पथकास व ठसे घेण्यासाठी फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण केले होते. या जबरी चोरीचा गुन्हा नारायणगाव पोलिसात दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जे. आय. पाटील करीत आहेत.

Web Title: In pune district thieves beat up an old couple and stole nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 12:35 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • devendra fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
1

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
2

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
3

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
4

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.