Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्घण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार पहाटे यवतमाळ शहरातील पिंपळगाव भागातील बालाजी पार्क परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 06, 2026 | 01:53 PM
प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:

यवतमाळ : प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्घण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार पहाटे यवतमाळ शहरातील पिंपळगाव भागातील बालाजी पार्क परिसरात घडली आहे. रोहित वीरेंद्र मेश्राम (वय १८, रा. बोबडे ले-आऊट, पिंपळगाव, यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश विजय ओंकार यांनी लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार या खूनप्रकरणी १५ आणि १६ वर्षे असलेल्या २ विधिसंघर्षग्रस्त बालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे घडलेल्या या थरारक घटनेनंतर लोहारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार रोहित चौधरी यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत घटनेचा आढावा घेत पंचनामा करत पुढील तपास सुरु केला होता.

दरम्यान, या खुनाच्या या घटनेत सामिल दोन्ही आरोपी फसार असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आकाश विजय ओंकार (वय ३९) यांनी लोहारा पोलिस ठाण्यात दिलेल्या जबानी तक्रारीनुसार, शनिवारी रात्री सुमारे १ ते १.३० वाजतादरम्यान संशयितापैंकी एकाने रोहितच्या मोबाइलवर फोन करून त्याला घराबाहेर बोलावले. रोहित हा घराबाहेर गेल्यानंतर बराच वेळ परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. घराबाहेर आरडाओरड ऐकू आल्याने वडील आकाश ओंकार यांनी बाल्कनीतून बाहेर पाहिले. त्यावेळी रोहितला त्याचे दोन्ही अल्पवयीन मित्र आपल्या हातातील शस्त्रांनी मारहाण करीत असल्याचे दिसल्याचा दावा पोलिसात दाखल तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. ही घटना पाहताच रोहितचे कुटुंबीय घटनास्थळी धावुन गेले. तोपर्यंत दोन्ही हल्लेखोर पळून गेले होते. तर रोहित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या पोट व छातीवर गंभीर वार करण्यात आल्याने पोटातील आतड्या बाहेर आल्या. यादरम्यान कोणतीही हालचाल करीत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.

हे सुद्धा वाचा : जिवलग मित्रांचा तो चित्रपट ठरला अखेरचा; मध्यरात्री बुलेटचा जीपला धडक, एकाचा मृत्यू अन्…

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद

या घटनेमागे २ दिवसापूर्वी झालेल्या वादाचा संबंध असल्याचा संशय आकाश विजय ओंकार यांनी व्यक्त केला. पोलिसात दाखल तकारीनुसार गुरुवारी रात्री मृताचा विधिसंघर्षग्रस्त दोन मित्र रोहितच्या प्रेयसीसोबत मोबाइलवर बोलत असल्याचे रोहितने पाहिले होते. त्यावरून बालाजी पार्क भाग-२ परिसरात रोहित आणि संशयित मित्र यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी रोहितने संशयित मित्राला थापड मारल्याची माहिती आकाश ओंकार यांना होती. ही बाब त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केली.

Web Title: Incident has occurred in the pimpalgaon area where a boy was murdered by his own friendan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…
1

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
2

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक
3

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
4

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.