Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! भरदिवसा हिरे व्यापाऱ्याचे अपहरण, दोन कोटींची खंडणी मागितली अन्…

दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. आर्थिक वादातून अपहरण झाले असण्याची शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 06, 2025 | 12:55 PM
पुणे हादरलं! भरदिवसा हिरे व्यापाऱ्याचे अपहरण, दोन कोटींची खंडणी मागितली अन्...

पुणे हादरलं! भरदिवसा हिरे व्यापाऱ्याचे अपहरण, दोन कोटींची खंडणी मागितली अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सातारा रस्त्यावरून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. व्यापाऱ्याचे अपहरणकर्ते तसेच व्यापाऱ्याचे अद्यापही काहीही लोकेशन मिळू शकलेले नाही. आर्थिक वादातून अपहरण झाले असण्याची शक्यता आहे. पोलीस कसून शोध घेत असून, सातारा रस्त्यावरील एका सोसायटीच्या परिसरातून सोमवारी सायंकाळी हे अपहरण झाले आहे.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अपहर्त व्यापाऱ्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, हिरे व्यापारी कुटुंबीयांसह पुणे-सातारा रस्त्यावर बिबवेवाडी परिसरातील सोसायटीत राहतात. हिरजडीत दागिन्यांची विक्री ते करतात. सोमवारी (४ मार्च) व्यापारी आणि त्यांची पत्नी मुलीला शाळेत आणण्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते. कारने सोसायटीत आले. नंतर लष्कर भागात कामानिमित्त जाणार आहे, असे सांगून व्यापारी दुचाकीने कॉम्पात आले होते. नंतर सायंकाळी सहाच्या सुमारास व्यापाऱ्याच्या पत्नीला त्यांच्यात फोनवरून संपर्क साधण्यात आला.

‘मैने आपके पतीको उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससूरजी को बोलो, दो घंटे में फोन करेंगे’ अशी धमकी दिली. नंतर व्यापाऱ्याच्या पत्नीने त्वरीत या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, विवेक मासाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबवेवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत. मुलीला शाळेतून बिबवेवाडीतील सोसायटीत सोडल्यानंतर हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाले. सोमवारी सायंकाळी हिरे व्यापारी सिंहगड रस्ता भागातील नवले पूल परिसरात असल्याचे तांत्रिक तपासात आढळून आले. नंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. नवले पूल परिसरात हिरे व्यापाऱ्याची दुचाकी पोलिसांना सापडली.

चालताना एक सीसीटीव्ही, कात्रज चौकात दिसतोय.

प्राथमिक चौकशीत दोन कोटींच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले. गेल्या काही दिवसांपासनून ते आर्थिक विवंचनेत होते. त्यांनी काही जणांकडून पैसे घेतले होते. अपहरणामागचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांनी घटनेच्या आदल्या दिवशी काहींना पैसे परत करतो असे सांगितले होते. पोलीस सीसीटीव्हीद्वारे शोध घेत आहेत.

हिरे व्यापाऱ्याचे अपहरण प्रकरणाचा तपास सर्व शक्यता गृहित धरून तपास करण्यात येत आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. व्यापाऱ्याची सुखरुप सुटका करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत असून, गुन्हे शाखा, तसेच स्थानिक पोलिसांची पथकांकडून तपास करण्यात येत आहे. – मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त

Web Title: Information has come to light that a diamond merchant was kidnapped in broad daylight in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • kidnapping
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप
1

Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका
2

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण
3

खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.