Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Accident: हृदयद्रावक घटना! खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला; मदतीला गेलेले दोघेही बुडाले

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे खदानीत सेल्फी काढताना एका मुलाचा पाय घसरला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे मित्रही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 09:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खदानीत सेल्फी काढताना एका मुलाचा पाय घसरला, त्याला वाचवताना तिघेही पाण्यात बुडाले.
  • तिन्ही मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून संपूर्ण अमळनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
  • पावसाळ्यात खदानी, तलाव आणि खोल पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये एका सेल्फीच्या मोहाने तीन निरागस मुलांचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. खदानीतील बेटासारख्या उंचवट्यावर सेल्फी काढताना एका मुलाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी दोन मित्रांनी हात दिला, मात्र तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Nanded Crime: मध्यरात्री पत्नीवर तीन राऊंड गोळीबार, आरोपी पती फरार; कौटुंबिक वादाचं धक्कादायक रूप

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणांची नावे मानव बंटी रतनानी (वय 14), कार्तिक विकी उधवानी (वय 14) आणि दिनेश विजय पंजवानी (वय 17) अशी आहेत. तिघेही अमळनेरच्या सिंधी कॉलनीमधील रहिवासी होती. 4.46 वाजता खदाणीत हे तिन्ही अलपवयीन मुले गेली होती. खदाणीत एक बेटासारखा उंचवटा असल्याने तिघे पाण्यातून चालत त्याच्यावर चढले. इकडच्या बाजूला एक फूट पाणी होते. त्यावेळी पाणी काढतांना एकाच पाय घसरला आणि त्याला वाचवायला दुसर्याने त्याचा हात धरला. मात्र तोही खाली जाऊ लागला म्हणून त्याने तिसऱ्याचा हात धरला मात्र तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. घडलेली घटना एका रिक्षावाल्याच्या नजरेस पडली. तो धावत खाली खदाणीजवळ पोहचला तोपर्यंत एकाने ११२ डायल केले.

तिन्ही मृतदेह ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच देवळी येथील व स्थानिक नागरिक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर देवळी येथील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

गावात हळहळ

तिन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक निकम , हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील, कॉन्स्टेबल गणेश पाटील यांनी पंचनामा केला. दिनेश हा प्रताप कॉलेजला 11 वी कॉमर्सला शिक्षण घेत होता. तर मानव हा पिबीए इंग्लिश मिडियम स्कूलला 9 वीमध्ये शिकत होता, त्याचे वडील हॉटेल कामगार आहेत. तर, कार्तिक देखील पीबीए स्कूलला 9 वी मध्ये शिकत होता, त्याचे वडील बेकरीत काम करतात. या तुम्ही मुलांच्या मृत्यूने अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांचे आवाहन

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नाले,तलाव, खदान भरलेले असतात पाण्याचे अंदाज येत नाही. त्यामुळे लहान मुलांनी आणि पोहता न येणाऱ्या नागरिकांनी अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

 

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्घटना कशी घडली?

    Ans: खदानीत सेल्फी काढताना एका मुलाचा पाय घसरला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही खोल पाण्यात बुडाले.

  • Que: या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: तिघा अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिसांनी नागरिकांना काय आवाहन केले?

    Ans: पावसाळ्यात खदानी, तलाव आणि इतर खोल पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे व सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नये.

Web Title: Jalgaon accident heart wrenching incident foot slipped while taking a selfie at a quarry both individuals who went to help drowned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण
2

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद
3

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण
4

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.