नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचं नाव विशाल जाधव असे आहे. तर त्याच्या पत्नीचे नाव अर्चना असे आहे. विशाल आणि अर्चना या दोघात सोमवारी मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले. या वादातून विशालने रागाच्या भरात पत्नी अर्चनावर विनापरवाना गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी तिच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत घुसल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर तिला तातडीने नांदेडला हलवण्यात आले. सध्या तिच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनतर विशाल तिथून फरार झाला.
दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाने पुरावे संकलित केले आहेत. फरार आरोपी विशालवर यापूर्वी मे 2025 मध्ये पेट्रोल पंप लुटीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो सध्या जामिनावर बाहेर होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शहरातील वाढता अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारीवर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
अन्न व औषध प्रशासनाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मंचर (जि. पुणे) येथे करून दूध भेसळीतील मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. कृत्रिम दूध निर्मितीच्या संशयातून २६ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत पोहोचले असून तिघांना ताब्यात घेतले आहे. मंचरच्या कारवाईत पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव आदी ठिकाणचे आरोपी समोर आले आहेत. या २६ आरोपींपैकी राहुरी तालुक्यातील तीन आणि नगर तालुक्यातील वाळकी येथील एक असे चौघे अहिल्यानगरचे आहेत.
Ans: नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात.
Ans: ती गंभीर जखमी झाली असून उपचारानंतर तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
Ans: आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी विशेष पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.






