काय घडलं नेमकं?
एकीकडे महापालिकेत उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरु होती, तर दुसरीकडे चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली. दुपारी अज्ञात कारणावरून शुभम सोनवणे याने गोलाणी मार्केट परिसरात साई बोराडे याचा पाठलाग करत छातीवर चाकूने वार केला. साई गणेश बोराडे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी शुभम सोनवणे याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी झालेल्या साईला तातडीने रिक्षाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेने परिसरात गोंधळ व भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Jalgaon Crime: भुसावळमध्ये थरार! पान टपरी लुटीचा प्रयत्न फसला अन् चालकावर थेट गोळीबार; परिसरात खळबळ
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून गोळीबाराची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पान टपरी चालकावर चार अज्ञातांनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गोळीबार करणारे अज्ञात आरोपी हे पान टपरीतील काही रक्कम लुटल्याचा प्रयत्न केला. यावेळी पान टपरी चालक प्रतिकार करतांना एका अज्ञाताने त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात पान टपरी चालकाच्या खांद्याला गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या पान टपरी चालकाचे नाव उल्हास गणेश पाटील असे आहे.
काय घडलं नेमकं?
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातल्या जळगाव नाका परिसरात उल्हास गणेश पाटील यांची पान टपरी आहे. पान टपरीवर चार अज्ञातांनी काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला.यातूनच प्रतिकार करताना एका अज्ञाताने टपरी चालक उल्हास गणेश पाटील यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तेथून ते फरार झाले. यात उल्हास यांच्या टपरी चालकाच्या उजव्या खांद्याला गोळी लागल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत टपरी चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार
Ans: जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात.
Ans: जखमी तरुणाचे नाव काय?
Ans: हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.






