घरापासून ३०० फूट अंतरावरच…
ही घटना शिवापूर शिवारातील आपल्याच शेतात असलेल्या उंबराच्या झाडाला या पती-पत्नीने एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला आहे. घरापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. दाम्पत्याची दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने घरी नव्हती.
Solapur Crime: 14 दिवसांपासून बेपत्ता… अखेर जिम ट्रेनर मृतावस्थेत सापडला; गळफास की घातपात?
पोलीस तपास सुरु
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आत्महत्यांमागचं कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहे.
मित्राच्या हातून मृत्यू! गावठी कट्ट्याच्या ‘मिसफायर’मध्ये 35 वर्षीय तरुण ठार; तपास सुरु
जळगाव येथून एक घटना समोर आली आहे. शहरातील अमलेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री एका गावठी कट्ट्यातून ‘मिसफायर’ झाला होता. त्यात एका ३५ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अरुण सुरेश महाजन असे मृत तरुणाचे नाव असून तो मंडप व्यवसायाशी निगडित होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय घडलं नेमकं?
शुक्रवारी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत माळीवाडा परिसरात गप्पा मारत बसला होता. त्यावेळी त्याचा एक मित्र भूषण महाजन हा आपल्याजवळील गावठी कट्ट्याबद्दल (पिस्तूल) माहिती देत होता. तो कट्टा हाताळत असताना अचानक त्यातून मिसफायर झाले आणि गोळी थेट अरुणच्या छातीत घुसली. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आहे.
Ans: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे.
Ans: शेतात उंबराच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेतला.
Ans: अद्याप कारण स्पष्ट नसून पोलिस तपास सुरू आहे.






