Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: आधी खून केला, मग मोबाईल विकायला बाहेर पडले अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात; जळगावात नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime: हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणातील चार आरोपी मुंबईच्या दिशेने पळून जात असताना जळगावात पोलिसांच्या ताब्यात सापडले. प्रवासासाठी पैसे संपल्याने मोबाईल विकण्यासाठी आरोपी जळगावात उतरले होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 02, 2026 | 01:22 PM
Jalgaon Crime: आधी खून केला (फोटो- सोशलमीडिया)

Jalgaon Crime: आधी खून केला (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हिमाचल प्रदेशातील खूनप्रकरणातील चौघे आरोपी जळगावात ताब्यात.
  • प्रवासाचे पैसे संपल्याने मोबाईल विकण्यासाठी आरोपी जळगावात उतरले.
  • हिमाचल पोलिसांच्या माहितीनंतर शनिपेठ पोलिसांनी शोधमोहीम राबवून चौघांना पकडले.
हिमाचल प्रदेशात खून केल्यानंतर मुंबईच्या दिशेने पसार झालेल्या चार आरोपींच्या पलायनाला जळगावातच ब्रेक लागला. प्रवासासाठी पैसे संपल्याने मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरलेल्या आरोपींचे लोकेशन हिमाचल प्रदेश पोलिसांनी जळगाव पोलिसांना कळविले. माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी शोधमोहीम राबवून चौघांना ताब्यात घेतले. Jalgaon Crime:

शिवीगाळ केल्याच्या कारणातून वाद

हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी एफआयआर क्रमांक ८२/२०२६, दि. ३० सप्टेंबर २०२६ अन्वये गुन्हा दाखल आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुकेश कुमार व आरोपी एकत्र दारू पीत असताना बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी हल्ला करून मुकेश कुमार यांचा खून केल्याची माहिती हिमाचल पोलिसांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

घटनेनंतर आरोपी सकाळी सुमारे ११ वाजता किसंपूर येथून निघाले. अंबाला येथे पोहोचल्यानंतर दुपारी ४.३० वाजता मुंबई एक्स्प्रेस पकडून त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र, प्रवासात खायलाही काही घेण्यासाठीही पैसे संपल्याने मोबाईल विकून पैसे उभे करण्यासाठी ते जळगावात उतरले. याचदरम्यान त्यांचे लोकेशन पोलिसांना मिळाले.हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना आरोपी शनिपेठ हद्दीत असल्याची माहिती दिली. त्यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने सूचना देत शोधमोहीम राबविली. हालचालींचा माग काढत पथकाने चौघांना ताब्यात घेतले.

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

चौघेही आरोपी बिहारचे

ताब्यात घेतलेल्यांमध्ये चंदन कुमार व रोशन गोगल मुखिया (रा. कुतुबपूर, पोलीस ठाणे सकरा, जि. मुझफ्फरपूर), संतोष कुमार (रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर) आणि अजित कुमार जोगा मेहतो (रा. पंडरक, जि. पाटणा, बिहार) यांचा समावेश आहे. चौघांना ताब्यात घेण्यासाठी हिमाचल प्रदेशातील तपासी अधिकारी जळगावकडे रवाना झाले आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया हिमाचल पोलिसांच्या ताब्यात आरोपी दिल्यानंतर होणार आहे. या कारवाईत पोहेकों विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने व रवींद्र साबळे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव शहरात अनेक दिवसांपासून वाळू माफिया, जुगार, मटका, गावठी दारू यासारखे अवैध धंदे खूप वाढले होते. यावर आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी स्पेशल टीमची नेमणूक केली. या टीमने एका दिवसांत तब्बल 9 ठिकाणी धाड टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 10 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 47 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे …

Web Title: Jalgaon himachal pradesh murder case four accused arrested rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Crime in Jalgaon
  • jalgaon Crime
  • Jalgaon News

संबंधित बातम्या

Jalgaon News: पाणीटंचाईची चाहूल लागताच प्रशासन अलर्ट! ‘या’ तारखेरपूर्वी पाणी आराखडा तयार करण्याचे आदेश
1

Jalgaon News: पाणीटंचाईची चाहूल लागताच प्रशासन अलर्ट! ‘या’ तारखेरपूर्वी पाणी आराखडा तयार करण्याचे आदेश

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
2

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू
3

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.