Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय

कल्याणच्या पारेकरवाडी परिसरात विवाहित गायत्री शिंदे हिचा घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. धारदार शस्त्राने हत्या झाल्याचा संशय असून तिचे वडील विनोद वसईकर हे घटनेनंतर फरार आहेत. सीसीटीव्हीत ते घाईघाईने इमारतीतून बाहेर पडताना दिसले असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2026 | 01:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विवाहित गायत्री शिंदे हिची घरात धारदार शस्त्राने हत्या.
  • आरोपी म्हणून वडील विनोद वसईकर यांच्यावर संशय, ते फरार.
  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या पोटच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घडलेली घटना कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

काय घडलं नेमकं?

हत्या झालेल्या मुलीचे नाव गायत्री शिंदे असे आहे. तर आरोपीचे नाव विनोद वसईकर असे आहे. ते सध्या फरार आहेत. पारेकरवाडी येथील रचना रॉयल इमारतीच्या फ्लॅट क्रमांक 102 मध्ये वसईकर कुटुंब वास्तव्यास आहे. विनोद वसईकर त्यांची पत्नी आणि मुलगा देखील खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात. मृत गायत्री हिचे नोवेंबर 2025 मध्ये लग्न झाले होते आणि ती काही दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी आली होती. रविवारी रात्रीपर्यंत सर्व काही सुरळीत होते. संपूर्ण कुटुंब एकत्र सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. संध्याकाळी गायत्री तिच्या आई-वडिलांसोबत काळा तलाव परिसरात फिरायलाही गेली होती.

छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्…

सोमवारी दुपारी गायत्रीने तिच्या आईला फोन करून सांगितले होते की ती आणि वडील घरीच आहेत. मात्र रात्री जेव्हा आई कामावरून घरी परतली आणि तिने घराचा दरवाजा उघडला तेव्हा तिला गायत्रीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. या घटनेने आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने तातडीने आपल्या मुलाला आणि पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. गायत्रीची हत्या धारदार शस्त्राने वार करून करण्यात आली आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात आरोपी विनोद वसईकर सकाळी कामावर गेल्यानंतर काही वेळातच पुन्हा घरी परतला होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास तो अत्यंत घाईघाईने इमारतून बाहेर पडताना दिसून आला. तेव्हापासून तो बेपत्ता आहे.

मात्र त्याने आपल्या स्वतःच्याच मुलीची हत्या का केली? हे टोकाचे पाऊल त्याने का उचलले? याचा देखील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तीन विशेष पथके रवाना केली आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर त्यांनी ही हत्या का केली यामागचे कारण स्पष्ट होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणीचे नाव गायत्री शिंदे आहे.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी परिसरात घडली.

  • Que: पोलिस कोणाचा शोध घेत आहेत?

    Ans: पोलिस गायत्रीचे वडील विनोद वसईकर यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Kalyan a heart wrenching incident father suspected of taking his own daughters life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Kalyan: अँटिलिया प्रकरणात परमवीर सिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Kalyan: अँटिलिया प्रकरणात परमवीर सिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
2

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
3

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
4

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.