रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)
KDMC News in Marathi : कल्याण डोंबिवलीमधील आरोग्य व्यवस्थेचं आणखी एकदा विदारक उदाहरण समोर आलं. केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेला पाच तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका महिलेचा रुग्णालयाच्या दारातच दुर्दैवी घटना घडली आहे. रुग्णालयात प्रशासनाने रुग्णवाहिकेस येण्यास उशीर झाल्याची कबूली दिली आहे. दरम्यान, पाच तास रुग्णवाहिकेला उशिर झाल्याने एका महिलेचा केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला. या प्रकरणात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेनंतर चार कर्मचाऱ्यांना निलंबीत ही करण्यात आले.
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर हाय अलर्ट, २७ विमानतळ बंद, ४०० उड्डाणे रद्द
कंत्राटी पद्धतीवर असलेल्या एका मेडिकल ऑफिसर सह एका स्टाफ नर्सला कमावरून कमी करण्याचे आदेश दिले आहे. इतकेच नाही तर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी एक सामान्य नागरीक बनून केडीएमसीच्या रुग्णालयास भेट दिली. स्वत: केस पेपर काढून रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला. आयुक्तांची आेळख पडल्या रुग्णालयातील स्टाफला मोठा धक्काच बसला.
कल्याण पूर्वेत राहणारी सविता बिराजदार या महिलेला केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलविण्यास सांगितले होते. मात्र तिला कळवा रुग्णालया नेण्याकरीता वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल पाच तास रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलेचा रुग्णालयाच्या दारात मृत्यू झाला. यावरुन महापालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केडीएमसी आयुक्त गोयल यांनी आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना दिले होते.
उपायुक्त बोरकर यांनी या प्रकणातील चौकशीचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला. या अहवालापश्चात आयुक्तांनी सहा जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणात रुग्णवाहिका चालक हरिश्चंदर यशवंतराव, प्रमोद लासूरे, वाहन चालक मारुती निकम, सिस्टर इनचार्ज जयश्री रायकर यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. तर कंत्राटी पद्धतीवर असलेले मेडिकल ऑफिसर डॉक्टर. उमर पटेल आणि स्टाफ नर्स नमिता भोये यांना सेवेतून कमी करण्यात आले.
आज आयुक्तांनी रुक्मीणीबाई रुग्णालयात सामान्य नागरीक बनून सरप्राईज व्हीडीट केली. त्यांनी स्वत: केस पेपर काढून रुग्ण असल्याचे सांगितले. यावेळी ओपीडी वेळेवर सुरु झाली नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यांनी या प्रकरणी रुग्णालयातील स्टाफला चांगलेच धारेवर धरले. आरोग्य सेवा सामान्य नागरीकांना पुरविता कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार आहे. असा कोणताही प्रकार घडल्यास संबंधित जबाबदार असलेल्या दोषींची कोणतीही गय गेली जाणार असा सज्जड इशारा आयुक्तांनी रुक्मीणीबाई रुग्णलय व्यवस्थापनास दिला आहे. Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर हाय अलर्ट, २७ विमानतळ बंद, ४०० उड्डाणे रद्द