कर्नाटक: कर्नाटकच्या मंगळुरु शहरातून मोठ्या सायबर फ्रॉड समोर आला आहे. सायबर भामट्याने इंस्टाग्राम युजरला फसवून त्याच्याकडून तब्बल ७८ लाख रुपये लुबाडल्याच समोर आलं आहे. लोकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली तत्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कारवाई करत आरोपींना सायबर फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचं नाव वासुदेवन आर असे आहे.
धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेवन लोकांच्या वैयक्तिक समस्या धार्मिक विधींद्वारे लगेच सोडवण्याचा दावा केला. यासाठी त्याने एक इंस्टाग्राम अकाउंट देखील तयार केलं आहे. या समस्या सोडवण्याच्या नावाखाली लोकांना त्याच्या जाळ्यात अडकवलं. आरोपी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनच लोकांशी संपर्क साधायचा आणि त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांच्या वैयक्तिक समस्या जाणून घ्यायचा. त्यानंतर, ती समस्या सोडवण्याचा दावा करून लोकांकडून पैसे उकळायचा.
आरोपीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वासुदेवन आर विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल तापसांनंतर,पोलिसांनी बंगळुरूच्या यशवंतपुर येथे राहणाऱ्या वासुदेवन आर या आरोपीला मंगळवारी अटक केली. आरोपी वासुदेवन आर याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल फोन आणि 20,300 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. त्यांनतर, आरोपीला बुधवारी न्यायालयात साधार करण्यात आला आहे. त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
५६ वर्षांची आजी आणि ३३ वर्षांचा बॉयफ्रेंड…, प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा, अर्धा जळालेला पाय सापडला
कर्नाटकातील चिक्कमंगलुरूमध्ये 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पतीच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या बायकोने हाय खाल्ली, रडत रडत ती शोक करू लागली. मात्र त्यानंतर धक्कादायक समोर आलं आणि सगळेच चक्रावले. कर्नाटकातील चिक्कमंगलुरूमध्ये सुब्रमण्यम (वय 60) असे मृत इसमाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, त्यांची पत्नी मीनाक्षम्मा (वय ५६) तिचा प्रियकर आणि इतर दोघांना दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या सुब्रमण्यमच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पत्नीवर तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.






